नाशिकचा पुष्पोत्सव राज्यात अद्वितीय : अभिनेत्री महंगाडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 01:15 AM2020-02-21T01:15:05+5:302020-02-21T01:15:57+5:30
गुलाबाचे विविध प्रकार आणि अन्य सारी फुले नाशिकमध्ये बघितली आणि निसर्गाविषयी खूप शिकायला मिळाले. नाशिकचा असा पुष्पोत्सव राज्यभरात पहायला मिळणार नाही, असे भावोद््गार ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या मालिकेतील राणू अक्काची भूमिका करणाऱ्या अभिनेत्री अश्विनी महांगडे यांनी काढले. नाशिक महापालिकेच्या वतीने आयोजित पुष्पोत्सवाचा शुभारंभ गुरुवारी (दि.२०) करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या.
नाशिक : गुलाबाचे विविध प्रकार आणि अन्य सारी फुले नाशिकमध्ये बघितली आणि निसर्गाविषयी खूप शिकायला मिळाले. नाशिकचा असा पुष्पोत्सव राज्यभरात पहायला मिळणार नाही, असे भावोद््गार ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या मालिकेतील राणू अक्काची भूमिका करणाऱ्या अभिनेत्री अश्विनी महांगडे यांनी काढले. नाशिक महापालिकेच्या वतीने आयोजित पुष्पोत्सवाचा शुभारंभ गुरुवारी (दि.२०) करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या.
प्रत्येकाच्या हक्काची तीन झाडं हवी, त्याने ती स्वत: लावावी आणि संगोपन करावे याचा राज्यभर प्रचार करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
महापालिकेच्या मुख्यालयात पुन्हा एकदा पुष्पोत्सवाने सुगंध दरवळला. अभिनेत्री अश्विनी महंगाडे यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद््घाटन झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर सतीश कुलकर्णी होते, तर व्यासपीठावर उपमहापौर भिकुबाई बागूल, सभागृह नेते सतीश सोनवणे, भाजपा गटनेते जगदीश पाटील, शिवसेना गटनेता विलास शिंदे तसेच विविध विषय समित्यांचे सभापती आणि उद्यान विभागाचे उपआयुक्त शिवाजी आमले उपस्थित होते.
पर्यावरण विषयक खूप गोष्टी नाशिकमध्ये बघायला आणि शिकायला मिळाल्या. शहरात ६० लाख झाडे लावण्याचा मनोदय आणि एका व्यक्तीने तीन झाडे लावायला हवी हे सुद्धा कळले. भावीपिढीला पुस्तकांबरोबरच अशा पुष्पांचाही अभ्यास करण्यास सांगायला हवे. मोबाइलच्या व्यसनातून बाहेर काढून मुलांना फुलांचे जग दाखविले आणि त्यांची माहिती दिली तर ते अधिक संपन्न होतील ,असेही महंगाडे म्हणाल्या. यावेळी महापौर सतीश कुलकर्णी यांनी नाशिक शहर पर्यावरणीय दृष्टिकोनातून समृद्ध असल्याचे सांगून पुष्पोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन केले. सतीश सोनवणे, विलास शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. स्वागत अजिंक्य साने यांनी केले. प्रास्ताविक चंद्रकांत खाडे यांनी केले. सूत्रसंचालन सीमा पेठकर यांनी केले, तर आभार श्याम साबळे यांनी मानले.
इन्फो...
नाशिक माझे सेकंड होम !
नाशिकशी माझे अतुट नाते जोडले गेले आहे. कारण येथे खूप साºया चांगल्या गोष्टी होतात. येथील वातावरण चांगले आहे, या शहराविषयी आकर्षण वाटते. त्यामुळे नाशिकला माझे सेकंड होम असावे असे वाटतं असे सांगून अभिनेत्री महंगाडे यांनी नाशिककर होण्याचा मनोदय व्यक्त केला. राणू अक्काच्या वेशभूषेत आलेल्या महंगाडे यांनी मालिकेतील खणखणीत संवाद सादर केला आणि जिजाऊ, शिवराय तसेच संभाजी यांचा जयजयकार करताच टाळ्यांचा कडकडाट झाला.
सोनू काठे यांना ‘गुलाब राजा’ पुरस्कार
स्पर्धात्मक पुष्पप्रदर्शनात ‘गुलाब राजा’ पुरस्कारचे सोनू रमेश काठे हे मानकरी ठरले, तर पुष्पक फ्लोरिटेक यांच्या गुलाबाला ‘गुलाब राणी’चा बहुमान मिळवला. ‘गुलाब राजकुमार’ पुरस्कार पपया नर्सरीने, तर ‘गुलाब राजकुमारी’ पुरस्कार बाबुलाल नर्सरीने पटकावला. फुलराणी ट्रॉफी बाबुलाल नर्सरीनेच मिळवली. सर्वोत्तम तबक उद्यान स्पधेत अरुण पाटील अव्वल राहिले.