अशोकाच्या चांदशी शाळेत नाशिककरांना घडणार ‘इस्त्रो’च्या प्रवासाची सफर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2019 07:58 PM2019-10-01T19:58:24+5:302019-10-01T20:02:43+5:30

‘विक्रम साराभाई स्पेस एक्झिबिशन’चे. येत्या शुक्रवारपासून (दि.४) अशोकाच्या चांदशी गावाजवळील अर्जुननगर येथील शाळेत हे विशेष प्रदर्शन भरविले जात आहे. प्रदर्शनाची वेळ सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत असून यासाठी सर्वांना प्रवेश खुला.

Nashik's journey to 'Isro' will take place at Ashoka's Chandshi school | अशोकाच्या चांदशी शाळेत नाशिककरांना घडणार ‘इस्त्रो’च्या प्रवासाची सफर

अशोकाच्या चांदशी शाळेत नाशिककरांना घडणार ‘इस्त्रो’च्या प्रवासाची सफर

Next
ठळक मुद्देअवकाशाविषयीचा वैज्ञानिक दृष्टीकोन वाढीस लागेल,इस्त्रोच्या २० उपकरणांचा समावेश

नाशिक : अंतराळाविषयी नेहमीच जनसामान्यांमध्ये कुतुहल पहावयास मिळते. अंतराळ मोहिमांविषयीदेखील विविध प्रश्नांचे काहुर लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच मनात उठलेले असते. कुतुहल अन् विविध प्रश्नांचे उत्तर थेट भारतीय अवकाश संशोधन संस्थेकडून(इस्त्रो) नाशिककरांना मिळणार आहे.
निमित्त आहे, जागतिक अंतराळ सप्ताहनिमित्त शहरात प्रथमच अशोका एज्युकेशन फाऊण्डेशन आणि इस्त्रोच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘विक्रम साराभाई स्पेस एक्झिबिशन’चे. येत्या शुक्रवारपासून (दि.४) अशोकाच्या चांदशी गावाजवळील अर्जुननगर येथील शाळेत हे विशेष प्रदर्शन भरविले जात आहे. प्रदर्शनाची वेळ सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत असून यासाठी सर्वांना प्रवेश खुला असल्याची माहिती फाउण्डेशनचे सहसचिव श्रीकांत शुक्ला यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी संस्थेच्या विश्वस्त आस्था कटारिया उपस्थित होत्या. यावेळी शुक्ला म्हणाले, इस्त्रोच्या वैज्ञानिकांमुळे मेट्रो शहरांप्रमाणेच नाशिकमध्येही अशोका समुहाला असे आगळेवेगळे प्रदर्शन भरविण्याची संधी मिळाली. हे प्रदर्शन नाशिककरांसाठी अत्यंत महत्त्वाचे असून जिज्ञासू भावी पिढीचा या प्रदर्शनातून नक्कीच अवकाशाविषयीचा वैज्ञानिक दृष्टीकोन वाढीस लागेल, असा विश्वास त्यांनी बोलताना व्यक्त केला.
प्रदर्शनासाठी मोफत संस्था व गु्रपची नावनोंदणी केली जात आहे. तीन दिवसांमध्ये प्रत्येक नावनोंदणी केलेल्य शाळांच्या विद्यार्थ्यांना प्रदर्शन बघता येणार आहे. यासाठी ठराविक वेळ निश्चित करून देण्यात येत आहे. जेणेकरून गर्दी व गोंधळ टाळता येण्यास मदत होईल. मनपा व जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शाळांनीदेखील नोंदणी केली असल्याचे शुक्ला म्हणाले. प्रदर्शनाचा समारोप रविवारी (दि.६) सायंकाळी होणार आहे.

वैज्ञानिकांशी खुला संवाद
शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना इस्त्रोच्या उपस्थित राहणाऱ्या पाच वैज्ञानिकांशी या प्रदर्शनाच्या निमित्ताने खुला संवाद साधता येणार आहे. अवकाश विज्ञान क्षेत्रात भवितव्य घडवू इच्छिणारे विद्यार्थी यावेळी मार्गदर्शन घेऊ शकतील. यासाठी प्रश्नोत्तरांचे सत्रदेखील ठेवण्यात आले आहे.

२० उपकरणांचा समावेश
प्रदर्शनात इस्त्रोच्या विविध २० उपकरणांचा समावेश राहणार असून यामध्ये आर्यभट्ट, भास्कर, अ‍ॅपल, स्त्रोससह विविध उपकरणांचा समावेश असणार आहे. साउंडिंग रॅकेट्स, पीएसएलव्ही, जीएसएलव्ही, एम-के३ आदिंच्या उड्डाण व जोखमीचा परिचय, रिमोट सेन्सिंग रचनेचा परिचय यावेळी वैज्ञानिकांकडून करून दिला जाणार आहे.
---

Web Title: Nashik's journey to 'Isro' will take place at Ashoka's Chandshi school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.