नाशिकचा 'लखोबा' अहमदनगर सायबर पोलिसांच्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2020 10:59 PM2020-10-03T22:59:38+5:302020-10-04T01:14:22+5:30
नाशिक । : जीवनसाथी डॉट कॉम या संकेतस्थळाच्या माध्यमातून महिलांशी संपर्क करत त्यांच्याशी लग्न करून फसवणूक करणा?्या नाशिक येथील 'लखोबा लोखंडे'ला अहमदनगरच्या सायबर पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या.
नाशिक । : जीवनसाथी डॉट कॉम या संकेतस्थळाच्या माध्यमातून महिलांशी संपर्क करत त्यांच्याशी लग्न करून फसवणूक करणा?्या नाशिक येथील 'लखोबा लोखंडे'ला अहमदनगरच्या सायबर पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या.
कुणाल नंदकुमार जगताप (37 रा. काठेगल्ली, त्रिकोणी गार्डन जवळ) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
जगतापने दाखविलेल्या विवाहाच्या आमिषाची बळी ठरलेल्या राहाता तालुक्यातील एका विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून 1 जुलै रोजी जगताप याच्याविरोधात सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. जगताप याने 2015 मध्ये फिर्यादी तरुणीशी जीवनसाथी डॉट कॉमच्या माध्यमातून संपर्क करून तिच्याशी विवाह केला होता. विवाहानंतर सदर तरुणीला जगताप याचे खरे स्वरूप समजले. त्याने अनेक मुलींची अशाच पद्धतीने फसवणूक केल्याचेही समोर आले. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यापासून सायबर पोलीस जगताप याचा शोध घेत होते. अखेर दोन दिवसांपूर्वी पोलिसांनी जगताप याला अटक केली. न्यायालयाने त्याला चार आॅक्टोबर दरम्यान पोलीस कोठडी दिली आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक सागर पाटील, उपाधीक्षक संदीप मिटके यांच्या मार्गदशर्नाखाली सायबर पोलिस स्टेशनचे निरीक्षक अरुण परदेशी, उपनिरीक्षक प्रतीक कोळी, पोलीस नाईक विशाल अमृते, अभिजीत अरकल, राहुल गुंडू, सम्राट गायकवाड, अमोल गायकवाड यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
इंजिनिअर असलेल्या जगतापच्या जाळ्यात
महिलांची फसवणूक करणारा कुणाल जगताप हा इंजिनियर आहे. तो बेंगलोर येथील एका कंपनीत नोकरी करतो. विवाह नोंदणी संकेत स्थळावर स्वत:ची प्रोफाईल अपडेट करून अविवाहित असल्याचे भासवितो. एखाद्या मुलीने सर्चींग दरम्यान त्याच्याशी संपर्क केल्यानंतर तो त्यांना लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करायचा. सायबर पोलिसांनी बेंगलोर येथे जाऊन स्थानिक पोलिसांच्या मदतीने जगताप याला अटक केली.