नाशिकच्या महारांगोळीची जागतिक स्तरावर दखल रेकॉडर््सचे कोंदण : अवघ्या सहा तासांत तयार झाली कलाकृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 01:12 AM2017-12-16T01:12:21+5:302017-12-16T01:13:37+5:30
येथील रांगोळी कलाकार सतीश व आसावरी धर्माधिकारी यांनी ‘अवयवदानाचे महत्त्व’ या विषयावर ५० बाय ५० फूट (२५०० स्क्वेअर फूट) आकारात काढलेल्या महारांगोळीची जिनियस बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड व वंडर बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डने नोंद घेतली आहे.
नाशिक : येथील रांगोळी कलाकार सतीश व आसावरी धर्माधिकारी यांनी ‘अवयवदानाचे महत्त्व’ या विषयावर ५० बाय ५० फूट (२५०० स्क्वेअर फूट) आकारात काढलेल्या महारांगोळीची जिनियस बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड व वंडर बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डने नोंद घेतली आहे.
शुक्रवारी (दि. १५) गंगापूर रोडवरील प्रसाद मंगल कार्यालय येथे सकाळी ८.४५ ते दुपारी २.४५ या अवघ्या सहा तासांच्या वेळेत ही विक्रमी रांगोळी पूर्ण झाली. या रांगोळीद्वारे अवयवदानाचे महत्त्व पटवून देत नागरिकांमध्ये या विषयाची जनजागृती करण्यात आली. इंद्रधनुष्य रंगांची ही महाकाय रांगोळी प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारी ठरत आहे. सायंकाळी या रांगोळीचे मान्यवरांच्या हस्ते फीत कापून उद््घाटन करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून नगरसेवक हिमगौरी आडके, डॉ. भाऊसाहेब मोरे, चित्रकार भि. रा. सावंत, प्रफुल्ल सावंत, राजेश सावंत, सुनील देशपांडे, प्रफुल्ल संचेती, गिरीश देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते. या विश्वविक्रमासाठी सहयोग देणाºया व्यक्ती व संस्था प्रतिनिधींचा यावेळी सत्कार करण्यात आला. ही रांगोळी प्रसाद मंगल कार्यालय येथे नाशिककरांना पुढील दोन दिवस (१६ व १७ डिसेंबर) दिवसभर पाहण्यासाठी खुली ठेवण्यात येणार असून, त्याचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. कार्यक्रमस्थळी जनकल्याण रक्तपेढीतर्फे रक्तदान शिबिर व रक्ततपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सक्षम नेत्रपेढी व हृषिकेश हॉस्पिटलतर्फे नेत्रदान व अवयवदानाविषयी माहिती देण्यात आली. नेत्रदानाचे अर्ज भरून घेण्यात आले. परीक्षक म्हणून अमी छेडा यांनी काम पाहिले. रांगोळी बघण्यासाठी परिसरातील नागरिकांनी विशेषत: महिलांनी गर्दी केली होती.