नाशिकमध्ये महापौरपदाच्या निवडणूकीवरून घमासान सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2019 04:58 PM2019-11-21T16:58:06+5:302019-11-21T17:00:27+5:30
नाशिक- शहराच्या सोळाव्या महापौरपदाची निवडणूक शुक्रवारी (दि.२२) होणार आहे. या निवडणूकीसाठी अवघे काही तास शिल्लक राहीले असताना देखील भाजप आणि उमेदवार निश्चित होत नसून रस्सीखेच सुरूच आहे. आता रात्रीच उमेदवारी घोषीत होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे नगरसेवकांची पळवापळवी सुरूच असून यांसदर्भात दावे प्रतिदावे केले जात आहे.
नाशिक- शहराच्या सोळाव्या महापौरपदाचीनिवडणूक शुक्रवारी (दि.२२) होणार आहे. या निवडणूकीसाठी अवघे काही तास शिल्लक राहीले असताना देखील भाजप आणि उमेदवार निश्चित होत नसून रस्सीखेच सुरूच आहे. आता रात्रीच उमेदवारी घोषीत होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे नगरसेवकांची पळवापळवी सुरूच असून यांसदर्भात दावे प्रतिदावे केले जात आहे.
महापौरपदाच्या निवडणूकीसाठी भाजप आणि शिवसेनेच्या साथीला असलेले कॉँग्रेस तसेच राष्टÑवादी कॉँग्रेस यांच्यात रस्सीखेच आहे. भाजपाचे पंधरा ते वीस फुटीर नगरसेक आपल्या गळाला लागलल्याचे दावे शिवसेनेच्या वतीने करण्यात येत आहे तर भाजपाकडून देखील विरोधकांच्या फोडाफोडीचे प्रयत्न सुरू असून त्याचा देखील निवडणूकीवर परिणाम होणार आहे भाजपाच्या वतीने महापौरपदासाठी दिनकर आढाव, शशिकांत जाधव आणि सतीश कुलकर्णी यांना अर्ज दाखल करण्यास सांगण्यात आले होते त्यानंतर भिकुबाई बागूल आणि गणेश गिते यांनी देखील अर्ज दाखल केले आहेत. परंतु त्यातील कोणालाही उमेदवारी घोषीत झाली नसून राजी नाराजीचे वातावरण असल्याने पक्षाकडून उमेदवारी घोषीत करण्यास विलंब होत आहेत.
शिवसेनेत देखील वातावरण तप्त असून काहींचा अजय बोरस्ते यांन तर काहींचा सुधाकर बडगुजर यांना विरोध आहे. त्यामुळे या दोघांवर नगरसेवकांचे समाधान झाले नाही तर सत्यभामा गाडेकर आणि विलास शिंदे यांच्या पर्यायाचा विचार होऊ शकतो.
या निवडणूकीत कॉँग्रेस आणि राष्टÑवादीने राज्यातील राजकिय समिकरणाप्रमाणे नाशिकमध्ये शिवसेनेबरोबरच राहण्याची तयारी दर्शविली आहे. तर मनसेने मात्र अद्याप आपले पत्ते खुले केलेले नाहीत. सकाळी मुंबईत राज ठाकरे यांनी मनसेच्या नगरसेवकांची बैठक घेतली. मात्र निर्णय जाहिर केलेला नाही.