नाशिकचा पारा ९.२ अंशावर; थंडीची तीव्रता अल्पशी घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2017 09:33 PM2017-12-31T21:33:11+5:302017-12-31T21:34:18+5:30

Nashik's mercury is 9.2 degrees; The intensity of the cold decreases drastically | नाशिकचा पारा ९.२ अंशावर; थंडीची तीव्रता अल्पशी घटली

नाशिकचा पारा ९.२ अंशावर; थंडीची तीव्रता अल्पशी घटली

Next
ठळक मुद्देथर्टी फर्स्टचा उत्साह बोच-या थंडीमुळे द्विगुणित रविवारी पारा वर सरकल्याने ९.२ अंश इतकी नोंद

नाशिक : शहराच्या किमान तपमानात सातत्याने घसरण होत असल्यामुळे थंडीचा कडाका कायम आहे; मात्र दोन दिवसांपासून पुन्हा पारा चढू लागला आहे. रविवारी (दि. ३१) पारा ९.२ अंशावर सरकला.
शहरात शुक्रवारी (दि. २९) ७.६ अंश इतक्या नीचांकी तपमानाची नोंद झाली होती. ही हंगामातील सर्वात नीचांकी नोंद ठरली. यानंतर शनिवारपासून पारा वर सरकण्यास सुरुवात झाली. रविवारी पारा वर सरकल्याने ९.२ अंश इतकी नोंद झाली. दोन दिवसांपासून पारा काही अंशाने वर सरकत असला तरी दहा अंशाच्या खाली राहत असल्याने थंडीचा कडाका कायम आहे. हवेत प्रचंड गारवा निर्माण झाल्याने संध्याकाळनंतर रस्तेही सामसूम होऊ लागल्याचे चित्र पाहावयास मिळत होते; मात्र रविवारी चित्र वेगळेच होते. थंडीची तमा न बाळगता रस्त्यांवर नाशिककर नववर्षाच्या स्वागतासाठी आल्यामुळे परिसरात गजबज पाहावयास मिळत होती. बोचºया थंडीमुळे नाशिककरांचा उत्साह काहीसा द्विगुणित झाला होता.
आठवडाभरापेक्षाही अधिक दिवसांपासून सतत किमान तपमान दहा अंशाच्या खाली राहत असल्याने शहरात थंडीची तीव्रता अद्यापही कायम आहे. एकूणच सरत्या वर्षाचा वीकेण्ड ‘कुल’ आठवण नाशिककरांना देऊन गेला. थर्टी फर्स्टचा उत्साह बोच-या थंडीमुळे अधिक वाढल्याचे चित्र पाहावयास मिळाले.

Web Title: Nashik's mercury is 9.2 degrees; The intensity of the cold decreases drastically

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक