आयसीएसई बोर्डात नाशिकचा निशाद टक देशात तिसरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2022 01:28 AM2022-07-18T01:28:37+5:302022-07-18T01:29:04+5:30
इंडियन सर्टिफिकेट सेकंडरी एक्झामिनेशन अर्थात आयसीएसई बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेत नाशिकच्या निशात समीर टक या विद्यार्थ्याने देशात तिसरा क्रमांक पटकावत दैदिप्यमान यश मिळवले आहे. निशाद नाशिकमधील मराठा विद्याप्रसारक समाजाच्या गंगापूर रोड येथील होरायझन स्कूलचा विद्यार्थी असून, त्याने शाळेतील शिक्षकांचे मार्गदर्शन आणि स्वयंअध्ययनाच्या जोरावर हे यशाचे शिखर गाठल्याने त्याच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
नाशिक : इंडियन सर्टिफिकेट सेकंडरी एक्झामिनेशन अर्थात आयसीएसई बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेत नाशिकच्या निशात समीर टक या विद्यार्थ्याने देशात तिसरा क्रमांक पटकावत दैदिप्यमान यश मिळवले आहे. निशाद नाशिकमधील मराठा विद्याप्रसारक समाजाच्या गंगापूर रोड येथील होरायझन स्कूलचा विद्यार्थी असून, त्याने शाळेतील शिक्षकांचे मार्गदर्शन आणि स्वयंअध्ययनाच्या जोरावर हे यशाचे शिखर गाठल्याने त्याच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
नाशिकमधील फ्रावशीस इंटरनॅशनल स्कूलमधून शालेय शिक्षणाची सुरुवात करणाऱ्या निशादने सहावीपर्यंतचे शिक्षण फ्रावशीस स्कूलमध्ये घेतल्यानंतर सातवीत होरायझन अकॅडमीत प्रवेश घेतला होता. या शाळेतही त्याने शिक्षकांच्या अध्यापनासह काही टेक्स्ट सिरीजच्या माध्यमातून स्वयंअध्ययन करून दहावीच्या परीक्षेत राष्ट्रीय पातळीवरील गुणवत्ता यादीत तिसरा क्रमांक पटकावला असून, राष्ट्रीय क्रमवारीत ३९व्या स्थानावर यश संपादन केले आहे. नाशिक जिल्ह्यातून त्याने पहिला क्रमांक पटकावला आहे. ही आनंदाची बातमी मिळताच निशादच्या कुटुंबियांचा आनंद गगनात मावेनासा झाला असून, निशादच्या यशामागे त्याचे कठीण परिश्रम आणि शाळेतील शिक्षकांचे मार्गदर्शन असल्याची प्रतिक्रिया निशादची आई रैना व वडील समीर टक यांनी व्यक्त केली आहे.