नाशिकचा प्रसन्न सुराणा देशात तिसरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:16 AM2021-02-09T04:16:58+5:302021-02-09T04:16:58+5:30

आयसीएआयच्या अधिकृत संकेतस्थळावर सोमवारी (दि.८) सीए फाउंडेशन व इंटरमिजिएट परीक्षांचे निकाल जाहीर केले. या परीक्षेत नाशिकच्या प्रसन्नकुमार सुराना याने ...

Nashik's Prasanna Surana is third in the country | नाशिकचा प्रसन्न सुराणा देशात तिसरा

नाशिकचा प्रसन्न सुराणा देशात तिसरा

Next

आयसीएआयच्या अधिकृत संकेतस्थळावर सोमवारी (दि.८) सीए फाउंडेशन व इंटरमिजिएट परीक्षांचे निकाल जाहीर केले. या परीक्षेत नाशिकच्या प्रसन्नकुमार सुराना याने तृतीय क्रमांक मिळवून नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. त्यामुळे निकाल जाहीर होताच सुराणा कुटुंबीयांनी जल्लोष केला. प्रसन्नचे आई वडील दोघेही प्रफुल्ल सुराणा व सुनीता सुराणा दोघेही व्यवसायाने डॉक्टर असून त्याच्या मार्गदर्शनामुळेच आपण सीए फाउंडेशन परीक्षेत यश संपादन केल्याची प्रतिक्रिया प्रसन्नने व्यक्त केली आहे. प्रसन्नबरोबरच जिल्ह्यातील इतर विद्यार्थ्यांनीदेखील घवघवीत यश संपादन केले आहे. सीए फाउंडेशनमध्ये प्रसाद खर्चे, मिताली भट्टड, मोनल गायखे यांनी यश मिळवले. सीए इंटरमिजिएट परीक्षेत सलील मनियार, शेफाली माहेश्वरी, चेतना भंडारी, मोईली तिवारी, हर्ष सावलानी, रिषभ डागा यांनी यश संपादन केले आहे. दरम्यान,

निकाल जाहीर होताच विद्यार्थ्यांनी त्यांचे मार्गदर्शक क्लासचालकांशी संपर्क साधून निकाल मिळविण्याचा प्रयत्न केला. उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी मि‌ळविलेल्या यशाचा जल्लोष करून आनंद साजरा केला.

कोट-

अकरावीपासूनच मयूर संघवी यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी रोज तब्बल आठ तास अभ्यास करून घेतला. त्यासोबतच घरी रोज नियमित पणे तीन तास अभ्यास करताना सीए अंतिम परीक्षेचा अभ्यास करणारी बहीण सेजल आणि पुण्यात प्रॅक्टिस करणारे मामा हर्षल ओसवाल यांचेही बहुमूल्य मार्गदर्शन लाभले.

- प्रसन्नकुमार सुराणा,

इन्फो-

सुराणा कुटुंबीयांसाठी दुग्धशर्करा योग

नाशिकच्या आदर्श विद्यालयातून दहावीपर्यंतचे शिक्षण घेत ९७ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या प्रनन्नकुमार सुराना याने सीए फाउंडेशनची परीक्षा देताना पहिल्याच प्रयत्न ३५७ गुणांसह देशात तिसरा क्रमांक पटकावला आहे. प्रसन्नने बारावीपर्यंतचे शिक्षण बिटको महाविद्यालयातून घेतले असून बारावीच्या परीक्षेत त्याने महाविद्यायातही तिसरा क्रमांक मिळविला होता. विशेष म्हणजे गेल्या आठवड्यात जाहीर झालेल्या सीए अंतिम परीक्षेचा निकालात प्रसन्नची बहीण सेजल सुराणा हिनेही दोन्ही ग्रुप उत्तीर्ण होऊन यश संपादन केल्याने सुराना कुटुंबासाठी हा दुग्धशर्कला योग ठरला आहे.

===Photopath===

080221\08nsk_43_08022021_13.jpg

===Caption===

सीए फाउंडेशन परीक्षेत देशात तीसरा क्रमांक पटकवणाऱ्या प्रसन्नकुमार सुरानाला पेढा भरवून आनंद साजरा करताना प्रसन्नचे वडील प्रफुल्ल सुराना, आई सुनीता सुराना व बहिण सेजल सुराना

Web Title: Nashik's Prasanna Surana is third in the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.