नाशिकच्या रामकुंड परिसराला विद्युत रोषणाईने झळाळी
By Suyog.joshi | Published: January 21, 2024 09:39 PM2024-01-21T21:39:20+5:302024-01-21T21:41:26+5:30
अनेक मंदिरांमध्ये भजन , कीर्तन, रामरक्षा स्तोत्र पठण, हनुमानचालीसा पठण, सुंदरकांड, पूजन, आरतीसह महाप्रसादाचे वाटप केले जाणार आहे.
नाशिक -: अयोध्या येथे २२ जानेवारीला होत असलेल्या प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेच्या पूर्वसंध्येला नाशिकचा रामकुंड परिसर विद्युत रोषणाईने झळाळला आहे. शहरातील नागरिकांनी हा देखावा पाहण्यासाठी गर्दी केली आहे.
नाशिक कुंभनगरीत असलेल्या विविध मंदिरांमध्ये २२ जानेवारीला दिवसभर भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीरामाचे वास्तव्य राहिलेल्या पंचवटीतील काळाराम मंदिर, कैलास मठ, कपालेश्वर महादेव मंदिरांना आकर्षक विद्यूत रंगबेरंगी माळा लावन्यात आल्या आहेत. याशिवाय अहिल्याबाई होळकर पूल, राम सेतु पूल, गांधी ज्योत, गाडगे महाराज पूल व रामकुंड परिसर झळाळला आहे. अनेक मंदिरांमध्ये भजन , कीर्तन, रामरक्षा स्तोत्र पठण, हनुमानचालीसा पठण, सुंदरकांड, पूजन, आरतीसह महाप्रसादाचे वाटप केले जाणार आहे. अनेक संस्था, संघटनांनी रामरक्षा सामूहिक पठनाचे आयोजन केले आहे.
अयोध्या येथे होत असलेल्या प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेच्या पूर्वसंध्येला नाशिकचा रामकुंड परिसर विद्युत रोषणाईने झळाळला #Nashik#AyodhyaRamMandirpic.twitter.com/AKy2gkjjiX
— Lokmat (@lokmat) January 21, 2024