नाशिकचा साहील समदानी राष्ट्रीय क्रमवारीत पंधराव्या स्थानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2022 01:56 AM2022-07-16T01:56:43+5:302022-07-16T01:57:12+5:30
इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियातर्फे १४ ते ३० मे दरम्यान घेण्यात आलेल्या सीए अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षेत नाशिकचे विद्यार्थी चमकले आहेत. नाशिकमधून साहील समदानी याने राष्ट्रीय क्रमवारीत पंधराव्या स्थानावर यश संपादन करीत सर्वांचेच लक्ष वेधून घेतले असून मकरंद जैन याने ४६ व्या क्रमवारीत यश मिळविले आहे.
नाशिक : इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियातर्फे १४ ते ३० मे दरम्यान घेण्यात आलेल्या सीए अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षेत नाशिकचे विद्यार्थी चमकले आहेत. नाशिकमधून साहील समदानी याने राष्ट्रीय क्रमवारीत पंधराव्या स्थानावर यश संपादन करीत सर्वांचेच लक्ष वेधून घेतले असून मकरंद जैन याने ४६ व्या क्रमवारीत यश मिळविले आहे.
चार्टर्ड अकाउंटंट (सीए ) अंतिम परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून या निकालात नाशिकच्या विद्यार्थ्यांनी देदीप्यमान यश मिळवले आहे. नाशिकमधून एस. व्ही. टूटोरियलचे पल्लवी सक्ते, ओमकार कातकाडे, प्रशांत कोष्टी, ध्रुमील शेरे, रुतुजा शुक्ल, पार्थ भराडिया, आर्चित शाह, किर्तिका घोडेकर, पार्श्व दुग्गड, प्रगती जैन या विद्यार्थ्यांसह माईंड स्पार्क अकॅडमीच्या प्रज्ञा डागा, नील शाह, भरत तुलसीयान, जिनेश लोढा, बुरानुद्दीन भागमल, मंजिरी देवरे, भार्गवी देवरे, वेदांग करमकर, तर पंचाक्षरी अकॅडमीची वेदांगी देशमुख आदी विद्यार्थ्यांनी सीए अंतिम परीक्षेत यश संपादन केले आहे.