नाशिकचे साहित्य संमेलन रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:15 AM2021-03-08T04:15:17+5:302021-03-08T04:15:17+5:30

नाशिक : नाशिकला २६ ते २८ मार्चदरम्यान जाहीर झालेले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन रद्द करण्यात आले असल्याची घोषणा, ...

Nashik's Sahitya Sammelan canceled | नाशिकचे साहित्य संमेलन रद्द

नाशिकचे साहित्य संमेलन रद्द

googlenewsNext

नाशिक : नाशिकला २६ ते २८ मार्चदरम्यान जाहीर झालेले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन रद्द करण्यात आले असल्याची घोषणा, अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या वतीने अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी औरंगाबादला केली. तर, नाशिकला झालेल्या पत्रकार परिषदेत संमेलन अनिश्चित काळासाठी पुढे ढकलले असले, तरी कोरोनाचा प्रसार कमी होताच त्यापुढील २० दिवसांत संमेलन घेण्याची तयारी असल्याचे

नाशिकला झालेल्या साहित्य संमेलन पदाधिकाऱ्यांच्या पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आले.

कोरोनाच्या आपत्तीवर कोणाचेही नियंत्रण नसल्यासारखीच स्थिती आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रभाव ओसरल्यावर नाशिकच्या स्वागत मंडळाला साहित्य महामंडळाशी चर्चा करून संमेलन कधी घ्यायचे, त्याबाबत निर्णय घेता येईल, असेही ठाले पाटील यांनी नमूद केले आहे. संमेलन तात्पुरते रद्द करताना राज्य शासन तसेच सर्व घटकांचा विचार करूनच निर्णय घेण्यात आला असल्याचेही त्यांनी नमूद केले. तर, नाशिकसाठीच्या संमेलनाची पूर्वतयारी जोरात सुरू असतानाच सर्वांच्या सुरक्षिततेकरिता हा निर्णय घ्यावा लागला असल्याचे संमेलनाचे कार्याध्यक्ष हेमंत टकले यांनी नाशिकच्या पत्रकार परिषदेत सांगितले. मात्र, कोरोनाची परिस्थिती निवळल्यानंतर तत्काळ त्यापुढील २० दिवसांत साहित्य संमेलन घेण्यास सज्ज असल्याचेही नमूद केले. स्वागताध्यक्ष छगन भुजबळ, महामंडळ अध्यक्ष ठाले पाटील आणि जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्या समन्वयातून हा निर्णय घेण्यात आला असल्याचेही टकले यांनी सांगितले. संमेलनाच्या आयोजनाची सर्वसज्जता असल्याने दर १५ दिवसांनी कोरोनाबाबतची आढावा बैठक घेणार असून कोरोनाची परिस्थिती निवळल्यानंतर तत्काळ पुढील संमेलनाची तारीख जाहीर करण्यात येणार असल्याचे निमंत्रक जयप्रकाश जातेगावकर यांनी सांगितले.

इन्फो

मे महिन्यापर्यंत घेण्याची अपेक्षा

स्थगित संमेलनाचे अध्यक्ष, मावळते अध्यक्ष आणि सर्व निमंत्रित साहित्यिक यामध्ये कोणताही बदल केला जाणार नसल्याचेही ठाले पाटील यांनी नमूद केले आहे. तसेच कोरोनाचा प्रसार आटोक्यात आल्यानंतर, मे, २०२१ पर्यंत नाशिकला संमेलन घेण्याची अपेक्षादेखील ठाले पाटील यांनी व्यक्त केली आहे.

Web Title: Nashik's Sahitya Sammelan canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.