राज्यस्तरीय थ्रो बाँल स्पर्धेकरीता नाशिकची स्नेहल साबळे महाराष्ट्र संघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 07:23 PM2018-11-29T19:23:30+5:302018-11-29T19:25:00+5:30

वनसगांव : जिल्हा क्र ीडा संकुल परभणी येथे १७ व १९ वर्षाआतील राज्य स्तरीय थ्रो बाँल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेतून स्नेहल विजय साबळे हिची १९ वर्षाआतील गटात महाराष्ट्र संघात निवड झाली. डिसेंबर मध्ये दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत ती महाराष्ट्राच्या संघात प्रतिनिधित्व करेल.

Nashik's Snehal Sabale in the Maharashtra team for the state level throw-up competition | राज्यस्तरीय थ्रो बाँल स्पर्धेकरीता नाशिकची स्नेहल साबळे महाराष्ट्र संघात

राज्यस्तरीय थ्रो बाँल स्पर्धेकरीता नाशिकची स्नेहल साबळे महाराष्ट्र संघात

googlenewsNext
ठळक मुद्दे डिसेंबर मध्ये दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत ती महाराष्ट्राच्या संघात प्रतिनिधित्व करेल.

वनसगांव : जिल्हा क्र ीडा संकुल परभणी येथे १७ व १९ वर्षाआतील राज्य स्तरीय थ्रो बाँल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेतून स्नेहल विजय साबळे हिची १९ वर्षाआतील गटात महाराष्ट्र संघात निवड झाली. डिसेंबर मध्ये दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत ती महाराष्ट्राच्या संघात प्रतिनिधित्व करेल.
ह्या स्पर्धेत पी. टी. विद्यालय, खेडलेझुंगे विद्यालयाची स्नेहल साबळे तसेच साक्षी पोपट घोटेकर, अश्विनी श्रावण गिते या विद्यार्थीनी सहभागी झाल्या होत्या. शाळेच्या स्थापनेपासूनच्या इतिहासात प्रथमच विद्यालयातील खेळाडूची निवड राष्ट्रीय स्तरावर झाल्यामुळे सर्व ग्रामस्थ व परिसरातील नागरिकांनी स्नेहलचा गौरव केला. तिला क्र ीडा शिक्षक विलास निरभवणे यांचे मार्गदर्शन लाभले.
स्नेहलच्या यशाबद्दल तिचे मविप्र अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, सभापती माणिकराव बोरस्ते, उपसभापती राघोनाना आहिरे, चिटणीस सुनिल ढिकले, सरचिटणीस निलिमा पवार, संचालक प्रल्हाद गडाख, एस. के. शिंदे, आर. डी. काजळे, सी. डी. शिंदे, दिनेश आहिरे, बाळू घोटेकर, आनंद घोटेकर, सोमनाथ घोटेकर, मुख्याध्यापक एस. सी. रहाटळ, पर्यवेक्षक डी. बी. कडवे, जी. एम. वायकर, यू. के. पवार, डी. बी. खडताळे, ए. एम. पवार, श्रीमती बी. सी. पगारे आदींनी कौतुक केले.

Web Title: Nashik's Snehal Sabale in the Maharashtra team for the state level throw-up competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.