‘वॉकेथॉन’मध्ये नाशिककरांचा उत्स्फुर्त सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2020 04:46 PM2020-01-17T16:46:22+5:302020-01-17T16:51:42+5:30
रस्ता सुरक्षा अभियानानिमित्त जिल्हा प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने अवयवदान जनजागृतीसाठी ईदगाह मैदान येथे ‘वॉकेथॉन’चे आयोजन करण्यात आले होते.
नाशिक : राज्यात सध्या सर्वत्र रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येते आहे. अपघातवाढ तसेच अपघाती मृत्यू रोखण्यासाठी जनजागृतीवर भर दिला जात आहे. यासाठीच रस्ता सुरक्षा अभियानानिमित्त जिल्हा प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने अवयवदान जनजागृतीसाठी शुक्रवारी (दि.१७) सकाळी ८ वाजता ईदगाह मैदान येथे ‘वॉकेथॉन’चे आयोजन करण्यात आले होते.
रस्ता सुरक्षा अभियानानिमित्त यंदा पहिल्यादांच प्रादेशिक परिवहन विभागाने अवयवदान जनजागृतीसाठी या ‘वॉकेथॉन’चे आयोजन के ले होते. अवयवदान आज सर्वात श्रेष्ठ दान समजले जात असून यामुळे एखाद्या व्यक्तिचे प्राण वाचविण्यास मोठी मदत होते. त्यामुळे या वॉकथॉनमध्ये वाहतूक सुरक्षेकडे गांभीर्याने पाहत असतानाच, अवयवदानाची चळवळ अधिक बळकट होण्याची गरज असल्याचे आवाहन करत, ‘अवयव जपा, वापरा आणि दान करा’, ‘वाहतुकीचे नियम पाळा, अपघात टाळा’, असे फलक यावेळी लावण्यात आले होते. यावेळी शहरातील विविध शाळा-महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांसह स्वयंसेवी संस्थाचे सदस्य व नाशिककरांनी वाहतूक सुरक्षेसह अवयवदानाचा जागर केला. यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे, पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनय आहिरे यांसह इतर मान्यवर मंचावर होते. प्रारंभी अवयवदानासह वाहतूक सुरक्षेबाबत मान्यवरांनी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी वॉके थॉनमध्ये मायको सर्कल ते ईदगाह मैदानापर्यंत ठिकठिकाणी अवयवदानाबाबत जनजागृती क रण्यात आली. कार्यक्रमात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ईदगाह मैदानापासून सकाळी ८ वाजता वॉकेथॉनला प्रारंभ झाला. मायको सर्कलपासून पुन्हा ईदगाह मैदानावर येत असताना ‘हेल्मेट घाला, सिग्नल तोडू नका’, ‘वेगाची नशा, जीवनाची दुर्दशा’, ‘चला अवयवदानाचा संकल्प करूया’, असे फलक उंचावून घोषणाबाजी करत जनजागृती करण्यात आली. यावेळी कसळकर यांनी उपस्थित नाशिककरांना अवयवदान आणि वाहतूक सुरक्षेची शपथ दिली. तसेच यावेळी अवदान करु इच्छिणाऱ्या व ते घेऊ इच्छिणाºया गरजू व्यक्तिंनी नोंदणी कोठे करावी याची प्राथमिक माहिती यावेळी देण्यात आली.