सदाभाऊ खोत यांचे ठिय्या आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 05:29 PM2021-06-28T17:29:30+5:302021-06-28T17:31:39+5:30

रयत क्रांतीचे सदाभाऊ खोत यांनी ठेवीही द्यायच्या नाही आणि कर्ज भरण्यासाठी तगादा करायच्या या जिल्हा बँकेच्या धोरणाबाबत टिका करुन ज्यांच्या ठेवी आहेत आणि ज्यांच्याकडे कर्ज आहेत ते ठेवीतुन वळते करुन घ्यायलाच हवे अशी मागणी करुन कर्जमाफी योजनेअंतर्गत आलेले साडेनऊशे कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले नसल्याचा आरोपही केला.

nashik,sadabhau,khot,district,bank's,sit-in agitation | सदाभाऊ खोत यांचे ठिय्या आंदोलन

सदाभाऊ खोत यांचे ठिय्या आंदोलन

Next
ठळक मुद्देजिल्हा बँकेने पिक कर्ज दिले नसल्याच्या निषेधाजिल्हा बँक प्रशासकांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.


नाशिक : ऐन हंगामात शेतकऱ्यांना जिल्हा बँकेने पिक कर्ज दिले नसल्याच्या निषेधार्थ रयत क्रांती सेनेचे संस्थापक माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी जिल्हाबँकेच्या दारात पांभर चालवुन ठिय्या आंदोलन केले. यावेळी आंदोलकांच्यावतीने नाशिक जिल्हा सहकारी बँकेचे प्रशासक शेख यांना मागण्यांचे दिनवेदन देण्यात आले. जिल्हा बँकेच्या पिक कर्ज वितरणातील   कारभाराचा निषेध करण्यासाठी सोमवारी (दि. २८) सकाळी भाजपा किसान आघाडी आणि रयत क्रांती सेनेच्यावतीने जिल्हा बँकेच्या प्रवेशव्दारासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले आहे.

    या आंदोलनात रयत क्रांती सेनेचे संस्थापक माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार भारती पवार, आमदार देवयाणी फरांदे, सीमा हिरे, ॲड. राहुल ढिकले, रयतचे प्रदेशाध्यक्ष शवनाथ जाधव , जिल्हाध्यक्ष वाल्मीक सांगळे , भाजपा जिल्हाध्यक्ष गिरीष पालवे, आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी आंदोलकांनी जिल्हा बँकेच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या देत राज्य शासनाच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. ह्य आम्ही काही ऐकनार नाही, घेतल्याशिवाय जाणार नाहीह्ण, ह्यराज्य सरकार हाय हाय , कर्जमाफी देणार का नाय ह्ण अशा वेगवेगळ्या घोषणांनी परिसर दणानुन गेला होता. आंदोलनस्थळी आणलेली बैल पांभर सदाभाऊ खोत यांनी बँकेच्या प्रवेशव्दारासमोर हाकुण शेतकऱ्यांना कर्जाची किती गरज आहे याकडे जिल्हा बँक प्रशासनाचे लक्ष वेधले.

   रयत क्रांतीचे सदाभाऊ खोत यांनी ठेवीही द्यायच्या नाही आणि कर्ज भरण्यासाठी तगादा करायच्या या जिल्हा बँकेच्या धोरणाबाबत टिका करुन ज्यांच्या ठेवी आहेत आणि ज्यांच्याकडे कर्ज आहेत ते ठेवीतुन वळते करुन घ्यायलाच हवे अशी मागणी करुन कर्जमाफी योजनेअंतर्गत आलेले साडेनऊशे कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले नसल्याचा आरोपही त्यांनी केला. यावेळी मान्यवरांची भाषणे झाली आंदोलनानंतर जिल्हा बँक प्रशासकांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. आंदोलनात पंकज शेवाळे, प्रशांत गोसावी, रोहिणी दळवी, नितीन गायकर, संजय शेवाळे, हेमंत पिंगळे, रामराव मोरे, फिरोज शेख, मनोज शिरसाठ आदींसह बहुसंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते. 

 

 

Web Title: nashik,sadabhau,khot,district,bank's,sit-in agitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.