नाशिकच्या विभागीय संदर्भ रुग्णालयाच्या छतावरून रुग्णाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2018 01:45 PM2018-02-07T13:45:42+5:302018-02-07T13:48:29+5:30
नाशिक : शालिमार येथील विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयाच्या छतावरून उडी घेऊन एका रुग्णाने आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (दि़७) सकाळच्या सुमारास घडली़ किसन पटोले असे आत्महत्या केलेल्या रुग्णाचे नाव असून गत अनेक दिवसांपासून तो संदर्भ रुग्णालयात उपचार घेत होते़
भद्रकाली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार किसन पटोले हे गत अनेक दिवसांपासून संदर्भ रुग्णालयात उपचार घेत होते़ सकाळच्या सुमारास त्यांनी संदर्भ रुग्णालयाच्या छतावर जाऊन खाली उडी घेतली़ यामध्ये डोक्यास गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला़ दरम्यान ही माहिती मिळताच भद्रकाली पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी हजर झाले होते़
दरम्यान, आत्महत्येचे कारण समजू शकले नसून आजारपणातील नैराश्यातून पटोले यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे़ या घटनेची भद्रकाली पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़