उत्तेजकद्रव्य प्रकरणात संजीवनीचे नाव आल्याने नाशिककरांना धक्का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 05:09 PM2018-11-28T17:09:37+5:302018-11-28T17:16:55+5:30
नाशिक : जागतिक अंमली पदार्थविरोधी संस्थेने (वाडा) घेतलेल्या चाचणीत धावपटू संजिवनी जाधवला दोषी धरण्यात आल्याने नाशिककरांसह तिच्या चाहत्यांनाही धक्का ...
नाशिक : जागतिक अंमली पदार्थविरोधी संस्थेने (वाडा) घेतलेल्या चाचणीत धावपटू संजिवनी जाधवला दोषी धरण्यात आल्याने नाशिककरांसह तिच्या चाहत्यांनाही धक्का बसला आहे.
आशियाई क्रीडा स्पर्धेपूर्वी गुवाहटी येथे झालेल्या आंतरराज्य निवड चाचणीदरम्यान वर्ल्ड अॅन्टी डोपिंग एजन्सीने घेतलेल्या उत्तेजक द्रव्य चाचणीचे निष्कर्ष सोमवारी जाहिर करण्यात आले. त्यामध्ये संजीवनहीसह अन्य चार धावपटूंना दोषी धरण्यात आले आहे. उत्तेजक द्रव चाचणीचे निष्कर्ष तब्बल सहा महिन्यांनी आले आहेत. त्यामुळे आताच असा अहवाल बाहेर येण्याचे कारण आणि बी सॅम्पल येण्यापूर्वीच जाहिर करण्यात आलेली नावे यामुळे याप्रकरणाविषयी संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, याप्रकरणी संजीवनीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तीच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
मिळालेल्या माहितीनुसार संजीवनी जाधवच्या चाचणीत जे उत्तेजक घटक द्रवाचा अंश आढळले असल्याचा अहवाल जाहिर करण्यात आला आहे. याविषयी क्रीडा क्षेत्रातील जाणकारांशी संपर्क साधला असता त्यांनी कोणता घटकद्रव आणि किती प्रमाणात आहे. शिवाय त्याचा धावण्यासाठीचा खरोखरीच उपयोग आहे का? संजीवनीची कामगिरी नेहमीपेक्षा फार उच्चत्तम पातळीवर झाली आहे का? या सर्वांची सांगड घातल्याशिवाय संजीवनीकडे दोषी म्हणून पाहाता येणार नाही. शिवाय बी-सॅम्पल येण्यापूर्वीच निष्कर्ष काढणेही चुकीचे असल्याचे जाणकरांचे म्हणणे आहे.