सौराष्ट्र कडे १५१ धावांचीआघाडी; महाराष्ट्राला फॉलोआॅन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 02:47 PM2018-12-16T14:47:07+5:302018-12-16T14:48:00+5:30

नाशिक: सौराष्ट्र च्या ३९८ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या महाराष्ट्रा संघाचा डाव २४७ गुंडाळत े सौराष्ट्र ने १५१ धावांची आघाडी घेत ...

nashik,saurashtra,get,runs,follow,maharashtra | सौराष्ट्र कडे १५१ धावांचीआघाडी; महाराष्ट्राला फॉलोआॅन

सौराष्ट्र कडे १५१ धावांचीआघाडी; महाराष्ट्राला फॉलोआॅन

Next
ठळक मुद्देरणजी करंडक क्रिकेट : केदार जाधवचे शतक एका धावेने हुकले


नाशिक: सौराष्ट्र च्या ३९८ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या महाराष्ट्रा संघाचा डाव २४७ गुंडाळत े सौराष्ट्र ने १५१ धावांची आघाडी घेत महाराष्ट्राला फॉलोआॅन दिला. शैलीदार फलंदाजी करणारा केदार जाधवचे शतक अवघ्या एका धावेने हुकले तर चिराग खुराना (३०) राहुल त्रिपाठी (३०),व सत्यजित बच्छाव (२१) यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र चेतन साकरीयाच्या भेदक गोलंदाजीपुढे महाराष्ट्राचे फलंदाज फारकाळ खेळपट्टीवर टिकू शकले नाही. शेवटचे वृत्त हाती आले तेंव्हा दुसऱ्या डावात महाराष्ट्राने एक बाद १७ धावा केल्या होत्या.
गोल्फ क्लब मैदान येथे सुरू असलेल्या महाराष्ट्रा विरूद्ध सौराष्ट्र यांच्यातील रणजी क्रिकेट सामना तिसºया दिवशी रंगतदार वळणार येऊन ठेपला आहे. भरभक्कम आघाडी मिळविलेल्या सौराष्ट्र ने महाराष्ट्राला फॉलोआॅन दिला असून सामना निकाली काढण्यासाठी सौराष्ट्र ने रणनिती आखली आहे. तिसºया दिवशी ३ बाद ८४ वरून पुढे खेळतांना महाराष्ट्राचा केदार जाधव आणि अंकीत बावणे यांनी दमदार फलंदाजी केली. कालच्या नाबाद ३० धावांवर असलेल्या केदार जाधवने सावध फलंदाजी करीत धावफलक हालता ठेवला. त्याला अंकीत बावणे चांगली साथ देत असतांनाच संघाच्या १४३ धावा झालेल्या असतांना महाराष्ट्राला चौथा धक्का बसला. कर्णधार अंकीत बावणे १४ धावांवर खेळत असतांना त्याला साकरीयाने त्रिफळाचित केले. केदार जाधवला साध देण्यासाठी रोहित मोटवानी मैदानात उतरला मात्र तो केवळ ११ धावा काढून बाद झाला. राहुल त्रिपाठी सोबत केदारने संघाला सावरले दोघांनी ३२ धावांची भागिदारी करून संघाची पडझड थांबविली मात्र त्यांना फार काळ मैदानात उभे राहाता आले नाही. एकीकडे केदार एकाकी किल्ला लढत असतांना दुसºयाबाजूने पडझड सुरूच होती. पाच फलंदाज बाद झाल्यानंतर केदारने काहीसा आक्रामक खेळ करीत ९९ धावांपर्यंत मजल मारली मात्र भराभर धावा जमविण्याच्या नादात केदार ९९ धावांवर मकवानाचा बळी ठरला.
त्यानंतर मैदानात उतरलेल्या सत्यजित बच्छाव आणि त्रिपाठीने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. त्रिपाठी (३०) तर सत्यजित बच्छाव (२१) धावांवर बाद झाले. महाराष्ट्राचा संघ २४७ धावांवर गारद झाला. सौराष्ट्र च्या चेतन साकरीयाने ६ तर जयदेव उनाडकट याने दोन बळी मिळविला.

Web Title: nashik,saurashtra,get,runs,follow,maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.