नाशिक मध्ये रंगणार महाराष्ट्र विरु द्ध सौराष्ट्र रणजी सामना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 06:18 PM2018-11-24T18:18:57+5:302018-11-24T18:19:59+5:30
नाशिक : बीसीसीआयच्या वतीने घेण्यात येणाऱ्या रणजी स्पर्धेतील महाराष्ट्रात होणाºया पाच सामन्यांपैकी एक सामना महाराष्ट्र विरु द्ध सौराष्ट्र नाशिक ...
नाशिक: बीसीसीआयच्या वतीने घेण्यात येणाऱ्या रणजी स्पर्धेतील महाराष्ट्रात होणाºया पाच सामन्यांपैकी एक सामना महाराष्ट्र विरु द्ध सौराष्ट्र नाशिक मध्ये दिनांक १४ ते १७ डिसेंबर दरम्यान होणार आहे. या सामन्यात भारतीय संघातील अनेक खेळाडू तसेच आयपीएल मध्ये प्रतिनिधित्व करणारे खेळाडू सहभागी होणार आहेत. त्यामध्ये महाराष्ट्र कडून केदार जाधव तर सौराष्ट्र कडून जयदीप उनाडकट यांचा समावेश असणार आहे. त्याचप्रमाणे नाशिकचा डावखुरा फिरकी गोलंदाज सत्यजित बच्छाव यालाही घरच्या मैदानावर नाशिककरांना आपला खेळ दाखवण्याची संधी मिळणार आहे .
नाशिक येथे होणाºया महाराष्ट्र विरूद्ध सौराष्ट्र या रणजी सामन्यासाठी बीसीसीआयचे पश्चिम विभागाचे ग्राउंड क्युरेटर रमेश म्हामूनकर शनिवारी सकाळी हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान येथे पाहणी करण्यासाठी आले होते. त्यांनी मैदानाच्या हिरवळीवर समाधान व्यक्त केले तसेच खेळपट्टी चांगली असून सामन्याच्या तयारीसाठी योग्य सूचना केल्या. सामन्यासाठी आवश्यक साधनसामुग्री,रोलर्स,ग्रास कटींग मशीन व इतर साहित्याबाबत माहिती घेतली. त्याच प्रमाणे खेळाडूंची ड्रेसिंग रूम व इतर व्यवस्था यांची पाहणी करून समाधान व्यक्त केले. रणजी सामन्याच्या तयारीच्या दृष्टिकोनातूनही त्यांनी काही आवश्यक सूचना केल्या. नाशिक जिल्हा क्रि केट असोसिएशनचे सेक्र ेटरी समीर रकटे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी खजिनदार हेमंत देशपांडे, योगेश हिरे, रतन कुयटे, शिवाजी उगले, श्रीपाद दाबक, संजय परिडा, निखिल टिपरी ,अनिरु द्ध भांडारकर, चंद्रशेखर दंदणे, तरून गुप्ता, राजु आहेर ,संकेत बोरसे, उपस्थित होते.