बनावट धनादेशाद्वारे स्टेट बँकेची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 05:06 PM2018-02-22T17:06:06+5:302018-02-22T17:11:40+5:30
नाशिक : बँकेतील लिपिकानेच बनावट धनादेश तयार करून तो खरा असल्याचे भासवून बँकेतून दीड लाख रुपये काढून घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार स्टेट बँक आॅफ इंडियाच्या कॅनडा कॉर्नर शाखेत घडला आहे़ या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार संशयित नीलेश सीताराम कुलकर्णी (रा. आनंद कुंज नंबर 1, जीपी रोड, नाशिक) यांच्या विरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

कॅनडा कॉर्नर येथील स्टेट बँक आॅफ इंडिया शाखेतर्फे संजय रामचंद्र बागते (५९) यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे़ त्यानुसार दि. ६ नोव्हेंबर २०१२ ते दि. १९ जानेवारी २०१३ या कालावधीत संशयित कुलकर्णी हे कॅनडा कॉर्नर येथील स्टेट बँक आॅफ इंडियाच्या शाखेत नोकरीला होते़ या कालावधीत त्यांनी बँकेचा बनावट धनादेश तयार केला व तो खरा असल्याचे भासवून बँकेतून १ लाख ५० हजार रुपये काढले़ मात्र, ही बाब बँक व्यवस्थापनाच्या लक्षात आली़
बँक व्यवस्थापनाने पोलिसांत कुलकर्णीविरोधात तक्रार केली असता गुन्हा दाखल करून घेतला जात नसल्याने जिल्हा न्यायालयात खासगी दावा दाखल करण्यात आला होता़ या दाव्याबाबत प्रथम वर्ग न्यायदंडाधिका-यांनी गुन्हा दाखल करून चौकशी करण्याचे आदेश पोलिसांना दिले़ त्यानुसार सरकारवाडा पोलिसांनी संशयित कुलकर्णी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे़
बँक आवारातील सीसीटीव्ही कॅमे-यांची चोरी
स्टेट बँक आॅप इंडियाच्या भाद्रपद सेक्टरमधील अंबड शाखेच्या आवारातील एटीएम रुममधील मशीन व यूपीएसची नुकसान करून चोरट्यांनी या रुममधील सीसीटीव्ही कॅमेरा व एलइडी बल्ब असा पाच हजार १०० रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना बुधवारी (दि़२१) रात्री घडली़ या प्रकरणी राजेंद्र संदानशिव (रा.जगतापमळा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़