शालेय विद्यार्थ्यांनी घेतली मांजा न वापरण्याची शपथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 07:41 PM2018-01-12T19:41:14+5:302018-01-12T19:45:47+5:30
नाशिक : राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसच्या वतीने अभिनव उपक्रम राबविण्यात आला असून, नाशिक शहरातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना साधा दोरा व कागदी पतंगांचे वाटप करून करण्यात आले. यावेळी नायलॉन दोरा न वापरण्याची शपथ विद्यार्थ्यांनी घेतली.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्या वतीने नायलॉन मांजाच्या विरोधात दरवर्षीप्रमाणे यंदाही शाळांमध्ये मोहीम राबविण्यात आली. नायलॉन मांजाच्या वापरामुळे अनेक अपघात होऊन नागरिक तसेच पक्षी जखमी होतात यात काहींना आपला जीवदेखील गमवावा लागला आहे.
मांजामुळे होणारे अपघात रोखण्यासाठी नायलॉन मांजाचा वापर न करता साध्या दोऱ्याचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले. यावेळी युवक पदाधिकाऱ्यांनी शालेय विद्यार्थ्यांना पतंगाचा साधा दोरा व कागदी पतंगाचे वाटप केले. नायलॉन मांजाच्या वापरावर सर्वोच्च न्यायालयानेच बंदी केली आहे. तरीही शहरात छुप्या पद्धतीने याची विक्री केली जात आहे. हा नायलॉन मांजा विकत घेतलाच नाही तर त्याची विक्री थांबेल याकरिता जनजागृतीची गरज असून, त्याची सुरुवात शालेय मुलांपासून करण्यात आली.
पतंग उडविताना नायलॉन मांजाच्या वापरामुळे अनेक अपघात होतात यामध्ये अनेक पक्ष्यांना जीवदेखील गमवावा लागला आहे. त्याचबरोबर पक्षांनादेखील याचा मोठा त्रास होतो. अनेक पक्षी यात जखमी होतात तसेच त्यात त्यांचे प्राणदेखील जातात. त्यामुळे जनजागृती केली जात आहे. यावेळी शाळेतील शिक्षक कर्मचाऱ्यांसह चिन्मय गाढे, भूषण गायकवाड, मितेश राठोड, संदीप खैरै, रोहित जाधव आदी.