श्रावणमासानिमित्त पंचवटीतील शिवमंदिरे सजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 04:34 PM2018-08-12T16:34:25+5:302018-08-12T16:38:54+5:30

पंचवटी : श्रावणमासानिमित्त पंचवटीतील विविध शिवमंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी (दि.१३) पहिला श्रावण सोमवार असल्याने कपालेश्वर महादेव मंदिरात विविध धार्मिक कार्यक्र म आयोजित करण्यात आले आहे.

nashik,shivamandir,sajali,shravanamasam | श्रावणमासानिमित्त पंचवटीतील शिवमंदिरे सजली

श्रावणमासानिमित्त पंचवटीतील शिवमंदिरे सजली

Next
ठळक मुद्देश्री कपालेश्वर महादेव मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम पंचमुखी मुखवट्याची सवाद्य पालखी मिरवणूक


पंचवटी : श्रावणमासानिमित्त पंचवटीतील विविध शिवमंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी (दि.१३) पहिला श्रावण सोमवार असल्याने कपालेश्वर महादेव मंदिरात विविध धार्मिक कार्यक्र म आयोजित करण्यात आले आहे.
पहाटे चार वाजता भाविकांसाठी मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात येणार आहे. सकाळी ६ ते दुपारी १२ पर्यंत श्रावणी सोमवारनिमित्ताने रु द्राभिषेक करण्यात येणार आहे. सकाळी मंदिरातील पुजारी अभिजित गाडे, अमोल थिटे, चिन्मय गाडे यांच्या उपस्थितीत महादेवाच्या पिंडीची पूजा करून अभिषेक व महाआरती करण्यात येईल. मुख्य मंदिरात रात्री भजनाचा कार्यक्र म होईल. सायंकाळी श्री कपालेश्वर मंदिरातून चांदीच्या पंचमुखी मुखवट्याची परिसरातून सवाद्य पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. पालखी मिरवणूक मालवीय चौक, शनि चौक, श्री काळाराम मंदिर, सरदार चौक, गंगाघाट, साईबाबा मंदिरमार्गे काढण्यात येऊन रामकुंडावर विधिवत पूजन करण्यात येईल. येथे आरती झाल्यानंतर कपालेश्वर मंदिरात महाआरती करून पालखीचा समारोप होईल. कपालेश्वर देवस्थानच्या वतीने संपूर्ण मंदिर परिसराला आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे, तर मंदिराच्या गाभाऱ्यात सजावट करण्याचे काम करण्यात आले आहे. भाविकांची गर्दी लक्षात घेऊन मंदिरात जाण्यासाठी मुख्य दरवाजाने प्रवेश बंद करून भाविकांना दक्षिण दरवाजाने आत जाण्याची व उत्तर दरवाजाने दर्शन घेऊन बाहेर निघण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. गंगाघाट परिसरातून मंदिराकडे जाणाºया मार्गावर दुचाकी व चारचाकी वाहनांना प्रवेश बंदी करण्यात येऊन पायी ये-जा करणाºया भाविकांना प्रवेश दिला जाणार आहे. मंदिर परिसरात शांतता व सुव्यवस्था टिकून रहावी यासाठी पोलीस कर्मचारी तसेच होमगार्ड तैनात करण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी दिली आहे.
इन्फो बॉक्स
प्रदक्षिणेस बंदी
श्रावण महिन्यातील पहिला श्रावण सोमवार असल्याने मंदिरात देवदर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांची गर्दी होणार आहे. भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन उद्या सोमवारी सकाळी सहा ते रात्री उशिरापर्यंत मंदिराला प्रदक्षिणा मारण्यास मनाई करण्यात आली आहे. दर्शनाला येणाºया भाविकांना मदत केंद्र म्हणून कपालेश्वर विश्वस्त मंडळाच्या वतीने मंदिर परिसरात ध्वनिक्षेपक यंत्रणा सूचना कक्ष उभारला आहे.

Web Title: nashik,shivamandir,sajali,shravanamasam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.