पंचवटी विभागीय कार्यालयात शुकशुकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 07:09 PM2019-04-18T19:09:13+5:302019-04-18T19:09:55+5:30
पंचवटी : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्यामुळे पंचवटी विभागीय मनपा कार्यालयातील कामकाजावर परिणाम जाणवत आहे. आचारसंहिते कामे नसल्याने आणि ...
पंचवटी : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्यामुळे पंचवटी विभागीय मनपा कार्यालयातील कामकाजावर परिणाम जाणवत आहे. आचारसंहिते कामे नसल्याने आणि काही कर्मचारी निवडणूक प्रशिक्षणासाठी असल्यामुळे कार्यालयात शुकशुकाट पसरल्यचे चित्र आहे.
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहिर झाल्यापासून लोकप्रतिनिधींनी कार्यालयात येण्याचे टाळले आहे. त्यामुळे नियमित कामकाजावर देखील परिणाम जाणवत आहे. पंचवटीतील सर्वच लोकप्रतिनिधींनी महापालिकेच्या पंचवटी विभागीय कार्यालयाकडे पाठ फिरवल्याने पंचवटी विभागीय कार्यालयात सर्वच विभागात शांतता पसरली आहे.
आचारसंहिता असल्याने का होईना अधिकाऱ्यांना लोकप्रतिनिधींच्या आदेशापासून काहीकाळ मोकळीक मिळाली आहे. अनेकांनी कामाचा ताण हलके झाल्याचेही सांगितले. दुसरीकडे संबंधित विभागाचे अधिकारी मात्र आचारसंहितेचे कारण पुढे करीत सर्वसामान्य नागरिक आणि लोकप्रतिनिधींचे देखील फोन उचलत नसल्याने लोकप्रतिनिधींची देखील अडचण होत असल्याची तक्र ार होत आहे. एरवी अनेक छोटेमोठे प्रश्न घेऊन पालिकेत येणºया नगरसेवकांची संख्या कमी झाली आहे. आचारसंहिता असल्यामुळे लोकप्रतिनिधींचे कक्ष बंद करण्यात आले आहेत. सभाही होत नसल्याने पालिकेकडे कुणीही फिरकतांना दिसत नाही.
एकीकडे आचारसंहिता जारी झाली असली तरी दुसरीकडे मात्र मनपा कार्यालयातील काही अधिखऱ्यांना मोकळीक मिळत आहे; तर काहींना महापालिकेचे दैनंदिन काम करून लोकसभा निवडणुकीचे काम देखील करावे लागत आहे. त्यामुळे सध्यातरी लोकप्रतिनिधींना प्रभागातील समस्या सोडवण्यासाठी अडचण निर्माण झाल्याचे चित्र आहे.