कामगार उपआयुक्त कार्यालयावर सीटूतर्फे निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 06:49 PM2021-06-25T18:49:18+5:302021-06-25T18:53:01+5:30
स्थानिक प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार दि.१२ ते दि.२३ मे दरम्यान लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यामुळे कामगारांना घरी राहावे लागले होते. याकाळातील वेतन देण्याबाबतचे शासनाकडून कोणतेही निर्देश दिलेले नाहीत.
सातपूर : कामगारांना लॉकडाउन काळातील वेतन मिळावे, ५० लाख रुपयांचा विमा काढण्यात यावा यासह विविध मागण्यांसाठी सिटू युनियनच्यावतीने कामगार उपायुक्त कार्यालयावर निदर्शने आंदोलन करण्यात आले.
स्थानिक प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार दि.१२ ते दि.२३ मे दरम्यान लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यामुळे कामगारांना घरी राहावे लागले होते. याकाळातील वेतन देण्याबाबतचे शासनाकडून कोणतेही निर्देश दिलेले नाहीत. तरी या काळातील संपूर्ण वेतन कामगारांना मिळावे व त्यांचा ५० लाख रुपयांचा विमा काढण्यात यावा, कंपनी आवारात कामगारांसाठी मोफत लस मिळण्याची सोय करावी, ज्या कामगारांनी या काळात काम केले आहे त्यांना एक हजार रुपये प्रति दिन प्रोत्साहन भत्ता देण्यात यावा, कामगार कर्मचारी बाधित झाल्यास त्याचा संपूर्ण खर्च कंपनीने करावा. कोरोनाच्या आजारामुळे कामगार कर्मचारी यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना ५० लाख रुपये मिळावेत, फॅब कंपनीतील बेकायदेशीर कमी केलेला सर्व स्थानिक कामगारांना त्वरित कामावर घ्यावे यासह विविध मागण्यासाठी कामगार उपायुक्त कार्यालयासमोर निदर्शने आंदोलन करण्यात आले. यावेळी सिटूचे जिल्हा अध्यक्ष सिताराम ठोंबरे, दिनेश सातभाई, संतोष काकडे, मोहन जाधव आदींनी मार्गदर्शन केले.