परिमंडळात १ हजार सौर कृषीपंप कार्यान्वित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2020 04:05 PM2020-03-08T16:05:48+5:302020-03-08T16:07:08+5:30
महावितरण : वीज जोडणीची वाट पाहाणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा नाशिक : ज्या शेतकºयांनी कृषी पंपासाठी वीज जोडणी घेतलेली किंवा काही ...
महावितरण: वीज जोडणीची वाट पाहाणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा
नाशिक: ज्या शेतकºयांनी कृषी पंपासाठी वीज जोडणी घेतलेली किंवा काही कारणास्तव वीज जोडणीस विलंब होत आहे अशा शेतकºयांना सौर ऊर्जेसाठी प्राधान्य देण्यात आल्यामुळे नाशिक आणि नगर जिल्ह्यात १ हजार ८४० सौर कृषीपंप कार्यन्वित झाल्याची माहिती नाशिक परिमंडळाकडून देण्यात आली.
अटल सौर कृषीपंप योजना तसेच मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेत्त वंचित शेतकºयांना प्राधान्य दिल्याने शेतकºयांना दिवसा सिंचन करणे शक्य झाले आहे. मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेत सहभागी होण्यासाठी सर्वसाधारण प्रवर्गातील लागार्थ्यांना ३ एचपीसाठी १६ हजार ५६० रु पये (दहा टक्के) तर अनुसूचित जाती- जमाती गटातील लाभार्थ्यांना ८ हजार २८० रु पये (५ टक्के), तर पाच एचपीसाठी सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांना २४ हजार ७१० रु पये (दहा टक्के) तर अनुसूचित जाती/जमाती गटातील लाभार्थ्यांना १२ हजार ७१० रु पये (१० टक्के) एवढी रक्कम भरायची होती.
मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेसाठी नाशिक परिमंडळाअंतर्गत असणाºया ज्या शेतकºयांनी पैसे भरून एजन्सीची निवड केली आहे. त्यामध्ये नाशिक शहर मंडळातील १ हजार ४९, मालेगाव मंडळातील १९५ तर अहमदनगर मंडळातील ५९६ शेतकर्यांच्या शेतात सौर कृषिपंप बसवण्यात आले आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील ज्या शेतकर्यांनी पैसे भरून एजन्सीची निवड केली आहे . त्यापैकी पहिल्या टप्यातील ४०९ आदिर दुसºया टप्यातील ५०३ शेतकºयांच्या शेतात सौर कृषिपंप बसवण्यात आले आहेत.
नाशिक परिमंडळातील एकूण १८४० शेतकºयांच्या शेतात मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेत सौर कृषीपंप बसविण्यात आले आहेत. सौरपंपामुळे दिवसा सिंचन शक्य होणार आहे. यात वीजपुरवठा खंडित होण्याचा, विजेच्या कमी दाबाचा प्रश्नच निर्माण होत नाही. विजेचा किंवा डिझेलचा वापर नसल्यामुळे वीजिबलाचा किंवा डिझेलचा खर्च वाचणार आहे.