विधानसभा निवडणूक तयारीला वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2019 06:01 PM2019-07-26T18:01:43+5:302019-07-26T18:02:15+5:30
बॅँगलोरवरून येणार साहित्य : मतदान यंत्राच्या बॅटऱ्या दाखल नाशिक : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी नाशिक जिल्ह्याने तयारीत आघाडी घेतली असून ...
बॅँगलोरवरून येणार साहित्य : मतदान यंत्राच्या बॅटऱ्या दाखल
नाशिक: आगामी विधानसभा निवडणुकीसाठी नाशिक जिल्ह्याने तयारीत आघाडी घेतली असून मतदानप्रक्रियेसाठी लागणारे कागद आणि मशीन्सच्या बॅटºया बॅँगलोर येथून दाखल झाल्या आहेत. दुसरी महत्वाची बाब म्हणजे राजकीय पक्ष कार्यालयांमध्ये मतदारयाद्या पोहचविण्याचे काम देखील सुरू झाले आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हा निवडणूक शाखेकडून करण्यात आलेल्या नियोजनाच्या माध्यमातून निवडणुकीच्या कामाला चांगलीच गती आली आहे. मतदारयाद्यांच्या शुद्धीकरणासाठी राबविण्यात आलेल्या मोहिमेमुळे संपुर्ण वातावरण ढवळून निघाले असून सर्वसामान्य नागरिक मतदानाच्या कामात गुंतल्याचे दिसते. विद्यार्थ्यांचा देखील सहभाग वाढल्यामुळे एकुणच जिल्ह्यातील निवडणूक तयारीच्या कामाला कमालीचा वेग आल्याचे दिसते. काही दिवसांपूर्वीच जिल्हा निवडणूक शाखेने राज्य निवडणूक आयोगाकडे संभाव्य यंत्रांची मागणी नोंदविली अूसन त्यानुसार बॅँगलोर येथून काही साहित्य दाखल देखील झाले असून लवकरच अन्य मशीन्स आणि साहित्य देखील दाखल होणार आहे.
निवडणूक शाखेने आयोगाकडे यापूर्वीच दहा हजार बॅलेट युनिट, सहा हजार व्हीव्हीपॅट व सहा हजार कंट्रोल युनिटची मागणी नोंदविली आहे. जिल्ह्यातील पंधरा मतदारसंघात सुमारे ४४ लाख इतकी मतदारांची संख्या असून, निवडणूक प्रकिया सुरळित पार पाडण्यासाठी निवडणूक शाखेने विशेष खबरदारी घेतली आहे. येत्या १५ सप्टेंबरला राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे.