महसूल कर्मचाºयांचे सप्टेंबरपासून कामबंद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2017 11:10 PM2017-08-20T23:10:08+5:302017-08-20T23:10:42+5:30
नाशिक : लिपिकाचे पदनाम बदलून कनिष्ठ महसूल करावे, पुरवठा निरीक्षकाची पदे सरळसेवेने भरू नयेत यांसह अन्य तीन मागण्यांसाठी सरकारला प्रथम निवेदन द्यायचे. याउपरही मागण्यांवर निर्णय न झाल्यास सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात संपूर्ण राज्यभरात बेमुदत कामबंद आंदोलन पुकारायचे असा एकमुखी निर्णय महसूल कर्मचारी संघटनेच्या बैठकीत रविवारी (दि़२०) घेण्यात आला.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनमध्ये रविवारी महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते़ या बैठकीत महसूल कर्मचाºयांसंदर्भातील दांगट समितीचा आकृतीबंद आॅगस्ट महिनाअखेरपर्यंत लागू करण्यात यावा, नायब तहसीलदारांच्या पदोन्नतीचे प्रमाण ६७ वरून ८० टक्के करण्यात यावे, महसूल विभागातील शिपायांना तलाठीपदी पदोन्नती देण्यात यावी या मागण्या सरकारपुढे मांडण्यावर संघटनेचे एकमत झाले.
महसूल कर्मचारी संघटनेतर्फे आपल्या विविध मागण्यांचे निवेदन सरकारला देण्यात येणार आहे. या मागण्या येत्या ३१ आॅगस्टपर्यंत मान्य न झाल्यास सप्टेंबरपासून राज्यभरात कामबंद आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे दत्तात्रय देशपांडे यांनी सांगितले़
या बैठकीला कार्याध्यक्ष दत्तात्रय देशपांडे, उपाध्यक्ष शंतनू गायकवाड, लक्ष्मण नरमवार, सरचिटणीस हेमंत साळवे, संघटनेचे विभागीय अध्यक्ष नंदकुमार गुरव, विलास कुरणे, दिलीप बारी, सुरेश जोशी, पद्माकर देशपांडे, ज्ञानेश्वर कासार, गणेश लिलके, अरुण तांबे, संतोष मोरे यांच्यासह जिल्ह्यातून तसेच राज्यभरातून आलेले संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते़ निवासी नायब तहसीलदार विठ्ठल मोराणकर यांनी सूत्रसंचालन केले. नाना पर्वत यांनी आभार मानले.