दोन दिवसांत नाशिक विभाग एसटीचे कोट्यवधींचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2018 10:36 PM2018-01-04T22:36:31+5:302018-01-04T22:51:07+5:30

शहरात गेल्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या आंदोलनामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागाचे कोट्यवधींचे नुकसान झाले असून, दोन दिवस बंद असलेल्या बसेसमुळे नियमित उत्पन्न तर बुडालेच शिवाय आंदोलनकर्त्यांनी दगडफेक करून १५ गाड्यांचे नुकसान केल्याने महामंडळाला मोठा आर्थिक फटका बसला आहे.

nashik,st,division,losses,caror | दोन दिवसांत नाशिक विभाग एसटीचे कोट्यवधींचे नुकसान

दोन दिवसांत नाशिक विभाग एसटीचे कोट्यवधींचे नुकसान

googlenewsNext
ठळक मुद्देआंदोलनाचा परिणाम; ३३ हजार किलोमीटरचे बुडाले उत्पन्न एकूण १५ बसेसचे सुमारे दोन लाख ४० लाख रुपयांचे नुकसान

नाशिक : शहरात गेल्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या आंदोलनामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागाचे कोट्यवधींचे नुकसान झाले असून, दोन दिवस बंद असलेल्या बसेसमुळे नियमित उत्पन्न तर बुडालेच शिवाय आंदोलनकर्त्यांनी दगडफेक करून १५ गाड्यांचे नुकसान केल्याने महामंडळाला मोठा आर्थिक फटका बसला आहे. नुकसानीचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात असला तरी यापेक्षा अधिक मोठे आर्थिक नुकसान असण्याची शक्यतादेखील वर्तविली जात आहे.
कोरेगाव भीमा येथील वादानंतर राज्यभरात निर्माण झालेल्या तणावानंतर संतप्त जमावाकडून बसेसला लक्ष्य करण्यात आले होते. नाशिकमध्येदेखील दोन दिवसांत सुमारे १५ बसेसचे काचा फोडून नुकसान करण्यात आले, तर चालकालादेखील मारहाण करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. आंदोलनाच्या पहिल्या दिवशी शहरातील विविध भागात एकूण ११ बसेसचे नुकसान करण्यात आले, तर दुसºया दिवशीच्या आंदोलनात चार बसेसला लक्ष्य करण्यात आले होते. एकूण १५ बसेसचे सुमारे दोन लाख ४० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज महामंडळाने वर्तविला आहे.
बसेसच्या नुकसानीमुळे लाखो रुपयांचा फटका महामंडळाला बसलाच शिवाय दोन दिवस बसेस बंद कराव्या लागल्यामुळेदेखील नियमित मिळणारे उत्पन्न मिळू शकले नाही. मंगळवारी झालेल्या आंदोलनात दुपारनंतर टप्प्याटप्पयाने बसेस बंद करण्यात आल्या त्यामुळे त्या दिवशी अंदाजे ११ लाखांचे नुकसान झाले, तर दुसऱ्या दिवशी पूर्णपणे सर्व मार्गांवरील बसेस बंद असल्याने महामंडळाचे सुमारे ८५ लाखांचे नुकसान झाले. केवळ प्रवासी उत्पन्नाचे दोन दिवसांत कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. त्यामुळे आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या एसटीला मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला आहे.

Web Title: nashik,st,division,losses,caror

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.