एसटी कर्मचाऱ्यांची मतदान सुटीवरून नाराजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2019 06:24 PM2019-04-05T18:24:37+5:302019-04-05T18:25:30+5:30
नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन महामंडळाने राज्यातील सर्व डेपो आणि कार्यशाळांच्या प्रमुखांना मतदानासाठी सुटीच्या नियोजनाबाबतचे पत्र पाठविले ...
नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन महामंडळाने राज्यातील सर्व डेपो आणि कार्यशाळांच्या प्रमुखांना मतदानासाठी सुटीच्या नियोजनाबाबतचे पत्र पाठविले असून, यामध्ये कार्यालयीन कर्मचाऱ्यांना सुटी जाहीर करून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना अर्धा ते दोन तासांच्या सुटीचे नियोजन सुचविले आहे. मात्र अत्यावश्यक सेवेमध्ये टायर प्रकल्प आणि कार्यशाळा कर्मचाऱ्यांना समाविष्ट केल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.
मतदानाच्या दिवशी कर्मचाºयांना मतदान करता यावे या हेतूने राज्य परिवहन महामंडळाने विभागनियंत्रकांना सुटीच्या नियोजनाबाबत कळविले आहे. त्यानुसार कार्यालयीन सर्व कर्मचाºयांना पूर्ण दिवसाची सुटी देण्यात आलेली आहे, तर अन्य कर्मचाºयांना मतदानासाठी अर्धा ते दोन तासांची सूट देण्यात आलेली आहे. अन्य कर्मचारी हे अत्यावश्यक सेवेमध्ये येत असल्याने त्यांना केवळ वेळेत सूट देण्यात आलेली आहे. मात्र टायर नूतनीकरण प्रकल्प आणि विभागीय कार्यशाळेतील कर्मचारी अत्यावश्यक सेवेमध्ये येत नसतानाही त्यांना सुटी देण्यात आलेली नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. अत्यावश्यक सेवेमध्ये नसल्याने या कर्मचाºयांना सार्वजनिक सुटी आणि साप्ताहिक सुटी घेण्याची सक्ती केली जाते दुसरीकडे मतदानाच्या दिवशी मात्र त्यांना अत्यावश्यक सेवेमध्ये कसे धरण्यात आले याविषयी कर्मचाºयांमध्ये नाराजी आहे.
एसटीतील चालक आणि वाहकांना अत्यावश्यक सेवा म्हणून मतदानासाठी काही तासांची सुटी देण्यात आलेली आहे. इतर कार्यालयीन कर्मचारीदेखील सुटीवर आहे. अत्यावश्यक सेवेत नसतांनाही टायर नूतनीकरण तसेच विभागीय कार्यशाळेतील कर्मचाºयांना सुटी देण्यात यावी, अशी मागणी होत आहे. महामंडळाच्या प्रशासकीय महाव्यस्थापकांनी या संदर्भातील प्रत्रक जाहीर करताना डेपो पातळीवर सुटी आणि कामाच्या वेळेत सवलत देण्याबाबतचे आदेश दिलेले आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवरच सुटीचे नियोजन करावे, अशी मागणी कर्मचाºयांकडून केली जात आहे.