शेतकऱ्यांच्या जमिनीचे लिलाव थांबवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2019 06:43 PM2019-05-02T18:43:51+5:302019-05-02T18:44:44+5:30
गंगापूर : नाशिक जिल्हा बॅँकेने ऐन दुष्काळी परिस्थिीत कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या उभ्या शेतीचे लिलाव करण्यास सुरु वात केली असून, नाईकवाडी ...
गंगापूर : नाशिक जिल्हा बॅँकेने ऐन दुष्काळी परिस्थिीत कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या उभ्या शेतीचे लिलाव करण्यास सुरु वात केली असून, नाईकवाडी येथील शेतकºयांच्या शेतीचा नऊ एकर जमिनीचा गेल्या ११ रोजी लिलाव केला, आता पुन्हा याच क्षेत्राचा लिलाव करण्याची नोटीस संबंधित शेतकºयांना काढल्याने संतप्त शेतकरी संघटनेच्या पदाधिकाºयांनी निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडेकर यांच्याकडे निवेदन सादर करून जिल्हा बॅँकेच्या या जबरदस्तीच्या शेती लिलावाचा तीव्र निषेध केला आहे.
भविष्यात जिल्हा बॅँकेच्या या जबरदस्ती शेती लिलावाविरोधात तीव्र आंदोलन करण्याची वेळ शेतकरी संघटनांवर आणू नये, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे शालेय शुल्क सरकारने माफ केले आणि अशा परिस्थिती जमिनीचे लिलाव होत असतील तर ते योग्य नाही, असे शेतकºयांचे म्हणणे आहे.
जिल्हाधिकाºयांना निवेदन दिल्यानंतर शेतकºयांच्या शिष्टमंडळाने थेट जिल्हा बॅँकेचे चेअरमन केदा आहेर यांची भेट घेऊन शेतकºयांच्या अडचणी मांडल्या. शेतकरी कर्ज बुडवत नाही मात्र यंदा दुष्काळ आहे, शेतीमालाला भाव नाही, पाऊस कमी आहे व त्यात शेतकरी नाशिक जिल्ह्यात आत्महत्या करीत आहे, अशा परिस्थितीत सक्तीची वसुली योग्य नसल्याचे शेतकरी संघटनेचे म्हणणे आहे.
जिल्हा बॅँक ही अडचणीत आल्याचे कारण नोटबंदी आहे. यावेळी शेतकºयांनी जिल्हा बॅँकेत चेअरमन व अधिकाºयांना थेट सवाल करताना शेतकºयांच्या सध्याच्या स्थितीतील सत्य परिस्थती काय आहे याबाबतची माहिती दिली. यावेळी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बॅँकेकडे असलेल्या ठेवी, शेतकºयांचे शेअर्स किती? असा सवाल करताना बॅँक अडचणीत येण्याचे कारणे शोधा, असा ही सवाल केला. शासनाच्या धोरणात शेतकरी भरडला जात असल्याचा आरोप करून दुष्काळात शेती लिलाव थांबवा, असे थेट आवाहन यावेळी जिल्हा बैंकेला करण्यात आले. याप्रसंगी नाईकवाडी येथील कर्जबाजारी शेतकरी खंडेराव भागुजी पाटील यांच्या जमिनीचे फेरलिलाव नोटीस घेऊन परिवाराने जिल्हाधिकारी व जिल्हा बँक गाठून आपली कैफियत मांडली.
यावेळी शेतकरी खंडेराव भागुजी कातडं त्यांच्या परिवारासह शेतकरी संघटनेचे भगवान बोराडे, शंकर पुरकर, रामनाथ ढिकले, प्रहारचे शरद शिंदे, अर्जुन तात्या बोराडे, शांताराम बोराडे, बापूसाहेब पगारे, प्रकाश चव्हाण यांसह अनेक शेतकरी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.