उत्पन्न वाढीसाठी एसटीने कंबर कसली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2020 05:16 PM2020-02-27T17:16:02+5:302020-02-27T17:17:31+5:30

नाशिक : एसटी महामंडळाची सेवा अधिक लोकाभिमुख व्हावी आणि कर्मचाऱ्यांची कार्यतत्परता वाढावी यासाठी परिवहनमंत्र्यांनी सुरू केलेल्या उत्पन्न वाढवा अभियानांतर्गत ...

nashik,st,tightens,the,waist,to,increase,income | उत्पन्न वाढीसाठी एसटीने कंबर कसली

उत्पन्न वाढीसाठी एसटीने कंबर कसली

Next
ठळक मुद्देडेपोत बैठका : परिवहनमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद

नाशिक : एसटी महामंडळाची सेवा अधिक लोकाभिमुख व्हावी आणि कर्मचाऱ्यांची कार्यतत्परता वाढावी यासाठी परिवहनमंत्र्यांनी सुरू केलेल्या उत्पन्न वाढवा अभियानांतर्गत जिल्ह्यातील आगारांमध्ये बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. जास्तीत जास्त प्रवासी आकर्षित करून त्यांना तत्पर सेवा देण्यासाठी चालक-वाहकांचे प्रबोधन केले जात आहे. विशेषता: उत्पन्न वाढीसाठी कार्यक्षम सेवा पुरविण्यासाठी अधिकाधिक उपाययोजना करण्याच्या सूचना विभाग नियंत्रकांनी संबंधित सर्व आगारांना केलेल्या आहेत.
आर्थिक संकटाचा सामना करणाºया एस. टी. महामंडळापुढे प्रवासी टिकविणे आणि उत्पन्न वाढविणे, असे दुहेरी आव्हान उभे राहिले आहे. आजवर अनेक प्रसंगातून सावसलेल्या एसटी महामंडळाने पुन्हा एकदा नव्याने उत्पन्न वाढीचा चंग बांधला आहे. ‘उत्पन्न वाढवा विशेष अभियान’ या मोहिमेद्वारे एका महिन्यात (मागील वर्षीच्या तुलनेत) सर्वाधिक उत्पन्न आणणाºया आगारांना दरमहा दोन लाख इतके रोख बक्षीस देण्याची घोेषणा परिवहनमंत्री अनिल परब यांनी केली आहे. जे आगार निकृष्ट कामगिरी करतील त्यांच्या शिक्षेचे प्रयोजनदेखील करण्यात आलेले आहे. १ मार्च ते ३० एप्रिल या दोन महिन्यांच्या कालावधीत महामंडळाने उत्पन्न वाढीसाठीचे नियोजन सुरू केले आहे.
त्याअनुषंगाने विभाग नियंत्रक नितीन मैंद यांनी आगार एक आणि आगार दोनमधील कर्मचाऱ्यांना कार्यतत्परतेचे मार्गदर्शन करताना तत्पर सेवेबाबत कटिबद्ध राहण्याच्या सूचना केल्या. आगार पातळीवर या स्पर्धा असल्याने प्रत्येक आगार प्रमुखाने आपल्या आगाराचे उत्पन्न वाढीसाठी विशेष प्रयत्न करावेत, असे आवाहनदेखील करण्यात आले आहे. जिल्ह्यातील पंधरा डेपोमध्ये उत्पन्न वाढीसाठी उपायोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यंदा अधिकारी कर्मचाºयांना केवळ उत्पन्न वाढीचेच आव्हान आहे, असे नाही तर शिक्षेपासून वाचण्यासाठीदेखील कार्यतत्परता कर्मचाºयांना दाखवावी लागणार आहे.

 

Web Title: nashik,st,tightens,the,waist,to,increase,income

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.