एस.टी. अधिकारीपदासाठी उद्यापासून लेखी परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 04:18 PM2019-05-16T16:18:16+5:302019-05-16T16:18:28+5:30
नाशिक : राज्य परिवहन महामंडळाच्या वर्ग एक आणि दोन अधिकारीपदासाठी शुक्रवार दि. १७ पासून उमेदवारांच्या लेखी परीक्षा होणार असून ...
नाशिक: राज्य परिवहन महामंडळाच्या वर्ग एक आणि दोन अधिकारीपदासाठी शुक्रवार दि. १७ पासून उमेदवारांच्या लेखी परीक्षा होणार असून परीक्षेची संपुर्ण तयारी झाल्याची माहिती परिवहन महामंडळाकडून देण्यात आली. दरम्यान, उमेदवारांना त्रयस्थ व्यक्तींकडून प्रलोभने दाखविली जात असल्याने उमेदवारांनी या संदर्भात तक्रार दाखल करावी असे अवाहन देखील करण्यात आले आहे.
महामंडळाच्या विविध विभागातील वर्ग एक आणि वर्ग दोन अधिकारी पदासाठी शुक्रवारपासून तीन दिवस आॅनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची परीक्षा प्रवेशपत्रे महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहेत. या संदर्भातील लघुसंदेश उमेदवारांना पाठविण्यात आली आहेत. तसेच ई-मेलद्वारे त्यांना या बाबतची माहिती देखील कळविण्यात आलेली आहे. संबंधित उमेदवारांनी आपली प्रवेशपत्रे संकेतस्थळावरून डाऊनलोड करून घ्यावीत असे आवाहन महामंडळाने केले आहे.
उमेदवारांनी परीक्षेच्या केंद्रावर किमान दिड तास अगोदर हजर रहावे असे देखील आवाहन करण्यात आले असून सदर परिक्षा आॅनलाईन पध्दतीने घेण्यात येणार असून, १०० प्रश्नांच्या या परिक्षेत प्रत्येक प्रश्नाला २ गुण असतील. परिक्षेचा कालावधी दीड तास असणार आहे. अशी माहिती महामंडळातर्फे देण्यात आली आहे.
ज्या उमेदवारांना प्रवेशपत्र अनूजही प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे त्यांना काही काही शंका असल्यास १८००५७२२००५ या नि:शुल्क दुरध्वनी क्र मांकावर संपर्क साधवा. तसेच उमेदवारांनी कोणत्याही अवैध प्रलोभन अथवा अमिषाला बळी न पडता प्रामाणकिपणे परिक्षा दयावी,असे आवाहन एसटी महामंडळाच्या वतीने करण्यात येत आहे.