न्यायालयीन कोठडीतील संशयिताचे पलायन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 07:40 PM2018-05-16T19:40:27+5:302018-05-16T19:57:14+5:30
नाशिक : जिल्हा व सत्र न्यायालयाच्या दिवाणी न्यायालयातून न्यायालयीन कोठडी सुनावलेला संशयित फरार झाल्याची घटना मंगळवारी (दि़ १५) दुपारच्या सुमारास घडली़ नरेंद्र सुधाकर जमदाडे (रा. आंबेडकरनगर, नाशिक) असे फरार झालेल्या संशयिताचे नाव असून, त्याच्या विरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

जिल्हा न्यायालयातील सहायक अधीक्षक विलास नागमोती यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित नरेंद्र जमदाडे याचा न्यायालयात दावा सुरू आहे. मंगळवारी (दि़ १५) संशयित जमदाडे हा वकिलामार्फत न्यायालयात हजर झाला़ न्यायाधीशांनी त्याचा वॉरंट रद्दबाबतचा अर्ज नामंजूर करून त्यास न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले़
यानंतर न्यायालयातील शिरस्तेदारांनी संशयिताचा रिमांड वॉरंट तयार करण्यासाठी त्याला ताब्यात घेतले असता संशयित जमदाडे याने साडेचार वाजेच्या सुमारास दिवाणी न्यायालयातील कोर्ट नंबर चार येथून न्यायालयाच्या कक्षातून पलायन केले़