अपहरणातील आरोपीचे नाशिक तालुका पोलीस ठाण्यातून पलायन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2018 11:14 PM2018-03-01T23:14:06+5:302018-03-01T23:14:06+5:30
नाशिक : अल्पवयीन मुलीच्या अपहरणातील संशयिताने नाशिक तालुका पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाºयास हिसका देऊन पळ काढल्याची घटना गुरुवारी (दि़ १) सायंकाळच्या सुमारास घडली़ मात्र, संबंधित पोलीस कर्मचा-याने आरडाओरड केल्याने त्याच्यासह पोलीस सहकाºयांनी पाठलाग करून नागरिकांच्या मदतीने पोलीस कवायत मैदानाजवळ पकडले़ बाळू सोमनाथ होडे (रा. गिरणारे, ता. नाशिक) असे पलायन करणा-या संशयिताचे नाव आहे़ दरम्यान, संशयित होडे हा मनोरुग्ण असल्याचे पोलिसांनी सांगितले़
नाशिक : अल्पवयीन मुलीच्या अपहरणातील संशयिताने नाशिक तालुका पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचा-यास हिसका देऊन पळ काढल्याची घटना गुरुवारी (दि़ १) सायंकाळच्या सुमारास घडली़ मात्र, संबंधित पोलीस कर्मचा-याने आरडाओरड केल्याने त्याच्यासह पोलीस सहकाºयांनी पाठलाग करून नागरिकांच्या मदतीने पोलीस कवायत मैदानाजवळ पकडले़ बाळू सोमनाथ होडे (रा. गिरणारे, ता. नाशिक) असे पलायन करणा-या संशयिताचे नाव आहे़ दरम्यान, संशयित होडे हा मनोरुग्ण असल्याचे पोलिसांनी सांगितले़
मुलीच्या अपहरण गुन्ह्यात तालुका पोलिसांनी संशयित बाळू होडे यास अटक करून गुरुवारी दुपारी न्यायालयात हजर केले़ न्यायालयाने त्यास न्यायालयीन कोठडी सुनावल्याने त्याची रवानगी नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात करावयाची होती़ त्यामुळे त्यास नाशिक तालुका पोलीस ठाण्यात आणले व येथून पोलीस वाहनाने कारागृहात सोडले जाणार होते़ हातात बेडी घालून एक पोलीस कर्मचारी सोबत असतानाच संशयित होडे याने पोलिसाच्या हातास झटका देत शरणपूर रोडने पळ काढला़
पोलीस कर्मचा-याने तत्काळ आरडाओरड करून त्याच्यामागे पळण्यास सुरुवात केली़ यानंतर पोलीस ठाण्यातील कर्मचारीही त्याला पकडण्यासाठी धावले़ आरोपी व त्याच्या मागे पोलीस पळत असल्याचे पाहून काही नागरिकही मदतीस धावले़ अखेर पोलिसांनी होेडे यास पोलीस कवायत मैदानाजवळ पाठलाग करून पकडले़ यानंतर तत्काळ होडेची मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली़ दरम्यान, तालुका पोलीस ठाण्यातून यापूर्वीही दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपी पळून गेला होता़ त्यास सुमारे चार महिन्यांनी पोलिसांनी पंढरपूरमधून अटक केली होती़