खात्यांची माहिती आज होणार जाहिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2020 08:04 PM2020-01-06T20:04:03+5:302020-01-06T20:04:56+5:30
नाशिक : शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी जाहिर करण्यात आलेल्या योजनेची रक्कम शेतकऱ्यांच्या आधारकाडॅ सलग्न बॅँक खात्यातच होणार असल्याने कर्जदार शेतकºयांना ...
नाशिक: शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी जाहिर करण्यात आलेल्या योजनेची रक्कम शेतकऱ्यांच्या आधारकाडॅ सलग्न बॅँक खात्यातच होणार असल्याने कर्जदार शेतकºयांना याचा लाभ मिळावा यासाठी आधार संलग्न नसलेल्या बॅँक खात्यांची माहिती संकलित करण्याचे कामकाज युद्धपातळीवर सुरू झाले आहे. जिल्हा आणि अन्य सरकारी बॅँकाच्या खात्यांची माहिती यांची सांगड घालण्याची प्रक्रिया बॅँका आणि जिल्हा प्रशासनाला घालावी लागत आहे.
शेतकºयांसाठी जाहिर करण्यात आलेल्या कर्जमुक्ती योजनेंतर्गत दोन लाखांचे कर्ज असलेल्या शेतकºयांच्या खात्यावर थेट रक्कम जमा केली जाणार आहे. परंतु त्यासाठी बॅँक खात्याला आधारकार्ड सलग्न असणे अपेक्षित असल्याने या संदर्भातील माहिती जाहिर करण्यासाठी राज्य शासनाने ७ जानेवारीची मुदत दिली आहे. त्यानुसार या कामाला वेग आला असून मंगळवार (दि७) रोजी सायंकाळपर्यंत आधारसंलग्न नसलेल्या बॅँक खात्यांची माहिती जाहिर होण्याची शक्यता आहे.
शेतकºयांना सन्मानाने या योजनेचे लाभ घेता यावा यासाठी राज्य शासनाने या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्याही अर्जाची गरज नसल्याचे जाहिर केलेले आहे. त्यामुळे शेतकºयांना शासकीय सोपस्कर पुर्ण करण्यासाठी लागणारा वेळ यामुळे वाचणार आहे. शेतकºयांच्या खात्यातच सदर रक्कम जमा होणार असल्याने जिल्हा प्रशासनाने जिल्हा तसेच राष्टÑीयकृत, सहकारी बॅँकामधील कर्ज खात्याची माहिती संकलित करण्याचे आदेश बॅँकांना दिले आहेत. त्यानुसार काही प्रमाणातील माहिती अपलोड करण्यास देखील प्रारंभ झालेला आहे.