पंचवटीतील पदपथावरील अतिक्रमण कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 01:53 PM2019-06-16T13:53:48+5:302019-06-16T13:54:47+5:30
पंचवटी : गंगाघाटावरील भाजी बाजार पटांगणालगत बसणाºया मोजक्याच भाजी विक्र ेत्यांना लगाम बसविण्यासाठी महापालिका अतिक्रमण हटाव पथक सकाळी नेहमीच ...
पंचवटी : गंगाघाटावरील भाजीबाजार पटांगणालगत बसणाºया मोजक्याच भाजी विक्र ेत्यांना लगाम बसविण्यासाठी महापालिका अतिक्रमण हटाव पथक सकाळी नेहमीच गंगाघाटावर दाखल झालेले असते मात्र निमाणी बसस्थानकाबाहेरचा परिसर, पंचवटी कारंजा, म्हसरूळ आदिंसह अन्य ठिकाणी असलेल्या पदपथावरील अतिक्र मणाकडे काना डोळा केला जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
भाजीबाजारात बसणाºया विक्रेत्यांना प्रतिबंध तर पदपथावरच्या हातगाडयांना सुट असा काहीसा प्रकार गेल्या काही महिन्यांपासून पंचवटीत सुरू असल्याने महापालिकेच्या अजब न्यायामुळे नागरिक देखील काहीसे संभ्रमात पडले आहे. लाखो रुपये खर्च करून महापालिकेने पाचदाऱ्यांसाठी केलेल्या पदपथावर नागरिक कमी आणि हातगाड्या अधिक असे चित्र अनेक वर्षांपासून बघायला मिळते. रस्त्याला लागून तयार केलेले पदपथ ये-जा करणाºया पादचाºयांसाठी खुले ठेवावे अशी मागणी प्रभाग बैठकीत लोकप्रतिनिधींकडून केली जात असते मात्र याकडे अतिक्र मण विभाग पूर्णपणे दुर्लक्ष करते. याशिवाय गंगाघाटावर असलेल्या भाजी बाजार प्रवेश द्वाराजवळ काही बोटावर मोजण्या इतके भाजी विक्र ेते बसलेले असतात त्यांच्यावर वचक बसावा म्हणून मनपा अतिक्रमण विभागाचे पथक चारचाकी वाहनासह दैनंदिन सकाळपासून दाखल झाल्याचे दिसून येते.