प्रदर्शनातून उलगडणार एस.टीचा इतिहास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 02:31 PM2019-07-29T14:31:25+5:302019-07-29T14:32:53+5:30
नाशिक : गेल्या ७० वर्षाच्या इतिहात प्रवासी सेवेत असलेल्या राज्य परिवहन महामंडळाने आपल्या सेवेत अनेक चढउतार पाहिले आणि अमुलाग्र ...
नाशिक: गेल्या ७० वर्षाच्या इतिहात प्रवासी सेवेत असलेल्या राज्य परिवहन महामंडळाने आपल्या सेवेत अनेक चढउतार पाहिले आणि अमुलाग्र बदलही केला. वाढती लोकसंख्या आणि विस्तारलेल्या क्षेत्रात पोहचतांना एस.टी. बसमध्ये कसा बदल होत गेला याविषयीची रंजक माहिती एस.टीच्या ‘वारी लाल परीची’ प्रवाशांना दिली जात असून सदर रथ मंगळवारी (दि.३०) जूने सीबीएस येथे येणार आहे.
एस.टीच्या निर्मितीला ७१ वर्ष पुर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य परिसहन महामंडळाने प्रवासी सेवेत वेळोवेळी केलेले बदल आणि दिलेल्या सुविधा याविषयीचा आढावा या प्रदर्शनातून मांडण्यात येणार आहे. राज्यातील ३६ जिल्ह्यातील प्रमुख ५० शहरांमधून परिवहन महामंडळाचे हे प्रदर्शन फिरविले जाणार आहे. बदलांचा इतिहास सांगणारी क्षणचित्रे व ‘वारी लाल परीची’ असे घोषवाक्य असलेला महामंडळाचा चित्ररथ दि. ३० रोजी नाशिकमध्ये दाखल होणार आहे तर दि. ३१ रोजी मालेगाव येथे या रथाचे आगमन होणार आहे.
भारतातील सर्वात मोठ्या प्रवासी परिवहन सेवेची माहिती जनतेला मिळावी यासाठी सदर रथ महामंडळाने तयार केला आहे. मागील काही वर्षामध्ये बससेचा आकार, रंगसंगती आरि अंतर्गत रचनेत अनेक बदल करण्यात आलेले आहे.लाल पिवळ्या बसेस पासून ते शिवशाही आणि बसस्थानकांपासून ते बसपोर्ट असा मोठा पल्ला गाठणाऱ्या राज्य परिवहन महामंडलाच्या बसचा प्रवास या प्रदर्शनातून उलगडणार आहे. या प्रदर्शनात जुन्या बसेसची छायाचित्रे, माहिती फळक, जूनी स्थानके, तिकीटे, आदिंचीं सचित्र माहिती मांडण्यात येणार आहे.