मालधक्क्यावरील माथाडींची सुरक्षा वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2020 03:20 PM2020-04-07T15:20:28+5:302020-04-07T15:22:08+5:30

नाशिक  : नाशिकरोडच्या रेल्वे मालधक्क्यावर माथाडी कामगारांच्या सुरक्षेची काळजी घेतली जात नसल्याचे चित्र आहे. कामगार, त्यांचे कुटुंब आणि समाजात ...

nashik,the,protection,of,mathakadi,mathadi,from,the,wind | मालधक्क्यावरील माथाडींची सुरक्षा वाऱ्यावर

मालधक्क्यावरील माथाडींची सुरक्षा वाऱ्यावर

Next
ठळक मुद्देकोरोना प्रादुर्भाव : प्रतिबंधात्मक साधनांची मागणी

नाशिक : नाशिकरोडच्या रेल्वे मालधक्क्यावर माथाडी कामगारांच्या सुरक्षेची काळजी घेतली जात नसल्याचे चित्र आहे. कामगार, त्यांचे कुटुंब आणि समाजात कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी माथाडींना मास्क, हॅँडग्लोज, सॅनिटायझर उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी रिपब्लिकन माथाडी कामगार संघटनेचे नेते रामबाबा पठारे यांनी केली आहे.
कोरोनामुळे सध्या प्रवासी रेल्वेगाड्या १४ एप्रिलपर्यंत बंद आहेत. मात्र, देशात अन्नधान्य, इंधन अशा जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरू रहावा म्हणून मालगाड्या धावतच आहेत. नाशिकरोडला मालधक्क्यावर मालगाड्या येतात. एक रेल्वेगाडी (रॅक) सुमारे ५६ डब्यांची असते. त्यात देशभरातून धान्य, सीमेंट आदी येते. सुमारे दोनशे ते तीनशे माथाडी धान्य उतरविण्याचे काम करतात. ट्रकमध्ये ही पोती भरून ती नाशिकरोडच्या सरकारी गोदामात नेली जातात. तेथून आदेशानुसार ती शहरात वितरित केली जातात. शुक्रवारी फूड कार्पोरेशन आॅफ इंडिया (एफसीआय) या सरकारी संस्थेचा रॅक नाशिकरोडला आला. त्यात २१ डब्यांमधून तांदूळ आले होते. ते सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत नाशिकरोडच्या गुदामात उतरविण्यात आले. तेथून त्याचे वितरण शहर व जिल्ह्यात होणार आहे. तांदूळ मालगाडीतून उतरवल्यानंतर तीस ते चाळीस ट्रकने ८० ते ९० फेऱ्या केल्या. सुमारे दीडशे माथाडी कामगारांनी हा माल रेल्वेगाडीतून उतरवून ट्रकमध्ये भरला. मात्र, या कामगारांना मास्क, सॅनिटायझर, हॅँडग्लोज असे काहीच नव्हते. मालगाडीतील माल देशभरातून येतो. त्यामुळे माथाडींमध्ये कोरोनाचा फैलाव होण्याची भीती आहे. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेची काळजी घेणे गरजेचे असल्याचे माथाडींचे म्हणणे आहे. दोन दिवसांपूर्वीदेखील जीवनावश्यक धान्य उतरवले होते. तेव्हादेखील कामगारांच्या आरोग्याची काळजी घेण्यात आली नव्हती. एफसीआय मनमाड, सेंट्रल वेअर हाऊन्सिंग कार्पोरेशन, विविध कंत्राटदार यांनी योग्य ती काळजी घेण्याची मागणी होत आहे.

Web Title: nashik,the,protection,of,mathakadi,mathadi,from,the,wind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.