ंमंगळवारी दोन्ही संघ होणार दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 07:01 PM2018-12-10T19:01:20+5:302018-12-10T19:02:44+5:30
नाशिक : भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाच्यावतीने गोल्फ क्कलब मैदान येथे घेण्यात येणाऱ्या रणजी क्रिकेट स्पर्धेसाठी मंगळवारी महाराष्ट्र आणि सौराष्ट्र ...
नाशिक: भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाच्यावतीने गोल्फ क्कलब मैदान येथे घेण्यात येणाऱ्या रणजी क्रिकेट स्पर्धेसाठी मंगळवारी महाराष्ट्र आणि सौराष्ट्र या दोन्ही संघांचे आगमन होणार आहे. येत्या १४ पासून या दोन्ही संघामध्ये रणजी सामना होणार असल्याने सामन्यापूर्वी किमान दोन दिवस दोन्ही संघ या मैदानावर सराव करणार आहेत.
रणजी क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र विरूद्ध सौराष्ट्र यांच्यात १४ ते १७ दरम्यान गोल्फ क्कलब मैदान येथे सामना होणारआहे. या सामान्यासाठी मैदानाची जोरदार तयारी सुरू असून भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाच्या देखरेखीखाली खेळपट्टीसह अन्य तयारीला वेग आला आहे. नाशिकच्या मैदानावर होणारा हा नववा रणजी सामना आहे. परंतु यंदा बीसीसआयच्या नियमांमुळे सामना आयोजन ते सामना संपेपर्यंत अनेक काटेकोर नियमांची अंमलबजावणी करावी लागणार आहे.
यंदाच्या मोसमात झालेल्या रणजी सामन्यात महाराष्ट्रने चार गुण कमाविले आहेत व ते ग्रुप ‘ए’ मध्ये सातव्या क्रमांकावर आहे. दुसरीकडे सौराष्ट्रने एका विजायाची नोंद करीत १३ गुण मिळविले आहे. या गटात सौराष्ट्र तिसºया क्रमांकावर आहे. त्यामुळे उभय संघामधील कोणत्या खेळाडूची कामगिरी नाशिकच्या मैदानावर उंचावते याकडे साºयांचेच लक्ष असणार आहे. नाशिकच्या या मैदानावर अनेक फलंदाज आणि गोलंदाजांनीही लक्ष वेधून घेतले आहे. या मैदानावरील कामगिरीनंतर अनेक दिग्गज खेळाडूंना भारतीय क्रिकेटचे दरवाजे खुले झाल्याचा इतिहास आहे.
दरम्यान, मंगळवारी रात्री किंवा बुधवारी पहाटे दोन्ही संघांचे नाशिकमध्ये आगमन होणार आहे. यापूर्वी झालेल्या कामगिरीच्या आधारावर उभय संघांची निवड होणार आहे. महाराष्ट्र कडून केदार जाधव तर सौराष्ट्र कडून डावरा जलदगदी गोलंदाज जयदेव उनाडकट यांची नावे चर्चेत आहेत. परंतु जाधव नाशिकमध्ये खेळू शकेल की नाही याविषटी ठामपणे सांगितले जात नाही.
या सामन्यासाठी नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विनोद शहा यांच्या मार्गदर्शनाखाली मैदान तयारीच्या बारकाईकडे समस्त कार्यकारिणी बारकाईने लक्ष ठेऊन आहे. मैदानाबरोबरच स्टेडीयम उभारण्याच्या कामाल गती देण्यात आली असून या कामावर कार्यकारिणीकडून तसेच बीसीसीआयकडून लक्ष केंद्रीत करण्यात आले आह े.