जुगार अड्डे चालविणाऱ्या तेरा संशयित तडीपार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 09:58 PM2018-06-11T21:58:19+5:302018-06-11T21:58:19+5:30
नाशिक : शहरातील कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच गुन्हेगारीला आळा बसावा पोलीस सतत प्रयत्नशील असतात़ त्यासाठी शहरात कोम्बिंग, आॅलआउट, नाकाबंदी तसेच अवैध जुगार अड्ड्यांवर छापे टाकले जातात़ मात्र, यानंतरही अवैध पद्धतीने जुगार अड्डे चालविणा-या संशयितांची यादी पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी तयार केली असून, त्यातील १३ संशयितांवर सहा महिन्यांसाठी तडीपारीची कारवाई केली आहे़

उपायुक्त पाटील यांनी परिमंडळ एकच्या हद्दीतील सर्व पोलीस ठाणेनिहाय जुगार अड्ड्यांवर टाकलेले छापे व छाप्यानंतरही पुन्हा सक्रिय झालेले व छापे टाकून पकडलेल्या जुगार अड्डे चालविणा-या संशयितांची २०१५ ते २०१८ अशी तीन वर्षांची यादी तयार केली़ या माहितीनुसार भद्रकालीतील तेरा जुगार अड्डे चालविणा-याविरोधात कारवाई करण्यात आली आहे़ दरम्यान, शहरातील अजून नऊ सराईत गुन्हेगारांविरोधात तडीपारीचे कारवाई सुरू आहे़
तडीपार करण्यात आलेल्या संशयितांमध्ये सलिम अब्दुल रेहमान पठाण (४७, रा. घ.नं. १२२७, तलवाडी, भद्रकाली) या टोळी प्रमुखांसह धर्मा उर्फ धर्मराज पुंजाराम सोनवणे (३५, रा. गंगापूरगाव), अशोक ऊर्फ सुभाष तुकाराम महाले (४०, रा. तेलंगवाडी, फुलेनगर, पंचवटी), अहमद अख्तर खान (२८, रा. मिनार मस्जिदसमोर, मुलतानपुरा, भद्रकाली), किशोर रामलाल अहेर (३७, रा. खडकाळी, भद्रकाली), उत्तम वामन वाघ (५०, रा. महलक्ष्मीचाळ, बागवानपुरा, भद्रकाली), भारत लक्ष्मण भडांगे (३२, रा. जगतापवाडी, सातपूर), परसराम रामदास आव्हाड (३३, रा. पाटील गल्ली, जुने नाशिक), रियाज अजिज शेख (३२, रा. घ.नं. १३४०, खडकाळी, भद्रकाली), मच्छिंद्र राधाकिसन खांबेकर (४५, रा. बुधवारपेठ, पाण्याचे टाकीजवळ, नाशिक), सचिन शरद इंगोले (२०, रा. जुम्मा मस्जिद, जुने नाशिक), अजिज गणी शेख (४२, रा. घ.नं. २३५५, बडीदर्गा) विष्णू बाबूराव आदमाने (२५, रा. निलगिरीबाग, औरंगाबादरोड, नाशिक) यांचा समावेश आहे.