आषाढी एकादशीसाठी राज्यातून ३ हजार बसेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 06:30 PM2019-06-19T18:30:41+5:302019-06-19T18:31:53+5:30

नाशिक : श्रीक्षेत्र पंढरपूर येथे होणाऱ्या आषाढी यात्रेसाठी राज्य परिवहन महामंडळाच्यावतीने पंढरपूर यात्रेसाठी नियोजित बसफेऱ्यांव्यतिरिक्त सुमारे तीन हाजर ७२४ ...

nashik,thousand,buses,from,the,state,for,the,ashadhi,ekadashi | आषाढी एकादशीसाठी राज्यातून ३ हजार बसेस

आषाढी एकादशीसाठी राज्यातून ३ हजार बसेस

googlenewsNext
ठळक मुद्देएस.टी. महामंडळ: सहाही प्रदेशातून बसेसचे नियोजन


नाशिक: श्रीक्षेत्र पंढरपूर येथे होणाऱ्या आषाढी यात्रेसाठी राज्य परिवहन महामंडळाच्यावतीने पंढरपूर यात्रेसाठी नियोजित बसफेऱ्यांव्यतिरिक्त सुमारे तीन हाजर ७२४ बसेसचे नियोजन केले आहे. याबाबतच्या सुचना महामंडळाच्या सर्व प्रादेशिक विभागांना देण्यात आल्या असून त्यांच्याकडून अतितरिक्त बसेस मागविण्यात आलेल्या आहेत.
आषाढी एकादशी यात्रेसाठी राज्य परिवहन महामंडळाने जय्यत तयारी केली असून त्याबाबतचे नियोजन राज्यपातळीवर केली आहे. श्रीक्षेत्र पंढरपूर यात्रेसाठी नियोजित बसफेºयांव्यतिरिक्त सुमारे तीन हाजर ७२४ बसेसचे नियोजन केले असून महाराष्टÑात येणाºया लाखो भाविक प्रवशांना सुरक्षित सेवा देण्यासाठी एस.टी. महामंहळाचे सुमारे पाच हजार चालक, वाहक, यांत्रिक कर्मचारी व अधिकारी पंढरपूर येथे तैनात करण्यात येणार आहे. येत्या १० ते १६ जुलै या कालावधीत महामंडळच्या कर्मचºयांवर प्रवासी वाहतुकीची मोठी जबाबदारी असणार आहे.
पंढरपुरची आषाढी यात्रा हा महाराष्टÑातील सर्व सामान्य जनतेचा जिव्हाळ्याची आणि भावनिक नाते सांगणारी यात्रा आहे. या यात्रेला मोठी परंपरा आणि धार्मिक, पारंपरिक महत्व असल्यामुळे भाविकांची गर्दी देखील मोठी असते. या भाविक प्रवाशांच्या भावनेचा विचार करून महामंडळाने राज्यभरातून बसेसचे नियोजन केले आहे. भाविकांना त्यांच्या गावातून थेट पंढरपूरला घेऊन जाण्याची योजना आहे. त्याबाबतचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी ग्रुप बुकींगची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. ५० ते ६० प्रवाशी एकत्र मिळाल्यास त्यांना त्यांच्या गावातून घेऊन जाण्याची व्यवस्था महामंडळ करू शकणार आहे.
पंढरपूर यात्रेसाठी औरंगाबाद प्रदेशाच्या १०९७, पुणे प्रदेशाच्या १०८०, नाशिक प्रदेशाच्या ६९२, अमरावती ५३३, मुंबई २१२ तर नागपूर प्रदेशाच्या ११० बसेसचे अतिरिक्त नियोजन करण्यात आले आहे.

Web Title: nashik,thousand,buses,from,the,state,for,the,ashadhi,ekadashi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.