नाशकात दुचाकीच्या डिक्कीतून तीन लाखांची रोकड लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 05:12 PM2017-10-13T17:12:59+5:302017-10-13T17:17:15+5:30

 nashik,Three,lakh,cash,lamps,two,wheeler | नाशकात दुचाकीच्या डिक्कीतून तीन लाखांची रोकड लंपास

नाशकात दुचाकीच्या डिक्कीतून तीन लाखांची रोकड लंपास

Next
ठळक मुद्देबँक आॅफ इंडियाच्या शाखेजवळउपनगर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा

नाशिक : नाशिक - पुणे महामार्गावरील बँक आॅफ इंडियाच्या शाखेजवळ पार्किंग केलेल्या दुचाकीच्या डिकीतून तीन लाखांची रोकड चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना गुरुवारी (दि़१२) बारा वाजेच्या सुमारास घडली़
उपनगर पोलीस ठाण्यात कचेश्वर केरूजी काळुंगेपाटील (४४, राफ़्लॅट नंबर २, गुरुमहिमा अपार्टमेंट, गुरुनगर, म्हसोबा मंदिराच्या मागे, नाशिक) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दुपारी १२ ते १२़३० वाजेच्या सुमारास बँक आॅफ इंडियाच्या शाखेत गेले होते़ त्यांची आपली अ‍ॅक्टिवा दुचाकी (एमएच १५, एफजे ६८५८) गुरुद्वाजवळील पार्किंगमध्ये उभी केली होती़ या दुचाकीच्या डिक्कीमध्ये तीन लाख रुपयांची रोकड होती़
काळुंगेपाटील हे बँकेत कामानिमित्त गेले असता चोरट्यांनी त्यांच्या दुचाकीच्या डिक्कीतील तीन लाख रुपयांची रोकड चोरट्यांनी चोरून नेली़ या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

Web Title:  nashik,Three,lakh,cash,lamps,two,wheeler

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.