मराठा आरक्षण मिळेपर्यंत ठिय्या आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2018 02:54 PM2018-08-05T14:54:28+5:302018-08-05T14:57:22+5:30

सकल मराठा समाज मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने येत्या ९ आॅगस्टपासून आरक्षण मिळेपर्यंत ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. शहरातील डोंगरे वसतीगृह मैदंना येथे दररोज सकाळी १० ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत आंदोलन करण्यात येणार असल्याच माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.

nashik,throwing,movementm,maratha,reservation | मराठा आरक्षण मिळेपर्यंत ठिय्या आंदोलन

मराठा आरक्षण मिळेपर्यंत ठिय्या आंदोलन

googlenewsNext
ठळक मुद्देमोर्चाचा निर्णय : राजकीय आणि बिगर राजकीय समिती जाहिरराजकीय आणि बिगर राजकीय समिती देखील गठित

नाशिक : सकल मराठा समाज मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने येत्या ९ आॅगस्टपासून आरक्षण मिळेपर्यंत ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. शहरातील डोंगरे वसतीगृह मैदंना येथे दररोज सकाळी १० ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत आंदोलन करण्यात येणार असल्याच माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. दरम्यान, मराठा आरक्षणासाठी राजकीय आणि बिगर राजकीय समिती देखील गठित करण्यात आली असून समितीसदस्यांची नावेही जाहिर करण्यात आली.
मराठा क्रांती मोर्चानाशिक जिल्ह्याच्यावतीने आयोजित पत्रकार परिषदेत सदर माहिती देण्यात आली. न्यायालयीन लढाईसाठी विधी तज्ज्ञांची मदत घेण्याबरेबरच जिल्ह्यातर्फे लवकरच रिट याचिका दाखल करण्याचा निर्णय नाशिक जिल्हा मराठा मोर्चाच्यावतीने घेण्यात आला. ९ आॅगस्ट पासून डोंगरे वसतीगृह मैदान येथे ठिय्या आंदोलन करण्याचा आणि त्यानंतर प्रत्येक तालुक्यातील समाजबांधव टप्याटप्याने ठिय्याा आंदोलनात सहभागी होणार आहेत. दरम्यान राजकीय समिती लवकरच जाहिर केली जाईल असेही सांगण्यात आले.
दरम्यान यावेळी राजकीय आणि बिगर राजकीय सुकाणू समितीची स्थापना करण्यात आली. शहर, तालुका, विधी आणि निधी संकलन, शिस्त, माध्यम तसेच नियोजन समिती देखील स्थापन करण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. पत्रकार परिषदेस अ‍ॅड. श्रीधर माने, सुनील बागूल, चंद्रकांत बनकर, हंसराज वडघुले, नाना बच्छाव आदि उपस्थित होते.
--इन्फो-
बिगर राजकीय समिती पुढील प्रमाणे-
अ‍ॅड, श्रीधर माने, चंद्रकांत बनकर, अशोक दुधारे, साहेबराव पाटी, प्रकाश मते, हिरष आडके, हंसराज वडघुले, हिरामण वाघ, राजेंद्र शेळके, योगेश कापसे, डॉ. उमेश मराठे, हरिदादा निकम, संजय पाटील, साहबेराव दातीर, अशोक पाटील, सुरेश भामरे, सुरेश भामरे, अ‍ॅड. विजय कातोरे, मुकूंद भोसले, अशोक कदम, बाळासहेब घडवजे, भारत निगळ, नाना बच्छाव आदि.

Web Title: nashik,throwing,movementm,maratha,reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.