तंबाखुजन्य पदार्थ विक्रेत्यांना ‘कोटपा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 05:24 PM2019-01-11T17:24:35+5:302019-01-11T17:25:37+5:30
नाशिक : शाळा, कॉलेजच्या शंभर यार्ड परिसरात सिगारेट, गुटखा, खैनी या सारख्या तंबाखूजन्य पदार्थ विकण्यास बंदी असल्याने सदर मोहिम ...
नाशिक : शाळा, कॉलेजच्या शंभर यार्ड परिसरात सिगारेट, गुटखा, खैनी या सारख्या तंबाखूजन्य पदार्थ विकण्यास बंदी असल्याने सदर मोहिम यापुढे व्यापक प्रमाणात राबविण्यात येणार आहे. यासाठी संस्थाचालक, संस्था याबरोबरच पालकांना देखील सहकार्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सार्वजनिक धूम्रपान आणि तंबाखूजन्य पदार्थांची अवैध विक्री करण्यास बंदी असतानाही चोरट्यापद्धतीने अशाप्रकारची विक्री होतांना दिसते. या विक्रीच्या विरोधात वारंवार सुचना आणि कारवाई करूनही शाळा, कॉलेजच्या परिसरात अशाप्रकारचे अड्डे निर्माण झाले आहेत. या ठिकाणी गुन्हेगारी स्वरुपाच्या देखील घटना घडत असल्याने आता यापुढे अशा ठिकाणांवर पोलिसांकडून कारवाई केली जाणार आहे.
चोरीछुप्या पद्धतीने बेकायदेशीर अंमलीपदार्थ विकणऱ्यांवर कोटपा कायद्याचा चाप बसविण्यासाठी नाशिक ग्रामीण पोलिसांनी धडक मोहीम हाती घेतली आहे. त्यासाठी कोटपा कायद्याचे खास प्रशिक्षण नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक संजय दराडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उप अधीक्षक सुरेश जाधव, अंमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक अशोक करपे यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक ग्रामीण पोलीस मुख्यालयात देण्यात आले. कर्करोग तज्ञ डॉ. शैलेश बोंदार्डे यांनी यावेळी तंबाखूमुळे होणाºया कॅन्सरबाबत सविस्तर माहिती दिली. तर संबंध हेल्थ फाऊंडेशनचे महाराष्ट्र राज्य व्यवस्थापक देविदास शिंदे यांनी सिगारेट्स आणि तंबाखूजन्य उत्पादने प्रतिबंधक ( कोटपा ) कायद्याची कलमे, कारवाई आण ि प्रभावी अमंलबजावणीबाबत खास प्रशिक्षण नाशिक ग्रामीण पोलिसांना दिले.
तर सर्व प्रकारच्या कॅन्सरपैकी ५० टक्के कॅन्सर आणि ९० टक्के तोंडाचे कॅन्सर हे केवळ तंबाखू सेवनामुळे होतात. त्यापैकी ५० टक्के रु ग्ण एक वर्षापेक्षा जास्त जगत नाहीत. तंबाखू सेवनाच्या कोणत्याही वापराबाबत चिंता व्यक्त करीत उपचारांपेक्षा तंबाखू विक्र ीस आळा घालणे अधिक महत्वपूर्ण असल्याचे मार्गदर्शन करताना कर्करोग तज्ञ डॉ. शैलेश बोंदर्डेयांनी सांगितले.
कोटपा कायद्याच्या सततच्या कारवाया केरळ आणि कर्नाटक राज्यात तंबाखूचा वापर कमी करण्यास प्रभावी ठरल्या आहेत. महाराष्ट्रात देखील पोलिसांबरोबर काम करण्यास आम्हाला आनंद होत असल्याचे केअरिंग फ्रेंड्सचे निमेश सुमती यांनी सांगितले.
--इन्फो--
महाराष्ट्रात जवळपास २.४ कोटी लोक तंबाखू उत्पादनाचा वापर करतात. तंबाखूमुळे होणाºया आजारात दरवर्षी ७२ हजार लोक मरण पावतात. श्वसनरोग, क्षयरोग आणि अन्य आजरापेक्षा ही सार्वजनिक स्थळी धूम्रपान करून इतरांच्या आरोग्य धोक्यात टाकतात. महाराष्ट्रात प्रत्येक्ष दिवशी ५३० मुले तंबाखूच्या संपर्कात येतात.