२७८ केंद्रांवर आज शिष्यवृत्ती परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 04:46 PM2019-02-23T16:46:23+5:302019-02-23T16:46:51+5:30
नाशिक : महाराष्टÑ राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून घेण्यात येणारी शिष्यवृत्ती परीक्षा रविवार दि. २४ रोजी घेतली जाणार आहे. शहर ...
नाशिक: महाराष्टÑ राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून घेण्यात येणारी शिष्यवृत्ती परीक्षा रविवार दि. २४ रोजी घेतली जाणार आहे. शहर आणि जिल्ह्यातील २७८ केंद्रांवर सदर परीक्षा होणार असून या परीक्षेसाठी एकुण ४५ हजार ३२७ विद्यार्थी बसले आहेत. या परीक्षेचे संपुर्ण नियोजन पुर्ण करण्यात आले असून विद्यार्थ्यांपर्यंत त्यांचे आसनक्रमांक पोहचविण्यात आले आहे.
पुणे येथील परीक्षा परिषदेच्यावतीने आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सदर परीक्षा घेतली जाणार आहे. नाशिक जिल्ह्यातून पुर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती (पाचवी) आणि पुर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (आठवी) च्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा जिल्ह्यातील २७८ केंद्रांवर होणार असून पर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा १२२ केंद्रांवर १९,२३८ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. त्यासाठी ९५४ पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती (पाचवी) साठी २६ हजार ८९ विद्यार्थी परीक्षा देणार असून १५६ केंद्रांवर परीक्षा घेतली जाणार आहे.
पहिला पेपर हा दुपरी १ ते २.३०, पेपर क्रमांक २ हा दुपारी ३.३० ते सायंकाळी पाच या वेळेत होणार आहे. सकाळच्या पहिल्या सत्रात प्रथम भाषा आणि गणिताची परीक्षा होणार आहे. दुपारच्या सत्रात तृतीय भाषा आणि बुद्धीमत्ता चाचणी परीक्षा होणार आहे. ३०० गुणांची ही परीक्षा असून ७५-७५ गुणांचे दोन पेपर्स असे परीक्षेचे स्वरूप आहे. परीक्षा सुरळीत पार पडावी यासाठी पत्येक केंद्रांवर एक या प्रमाणे २७८ केंद्रसंचालकांची नियुक्ती करण्यात आली आहे. आबजेक्टीव टाईप ही परीक्षा असल्याने विद्यार्थ्यांना परीक्षेनंतर उत्तरपत्रिकेची कार्बनप्रिंट मिळणार आहे. स्पर्धा परीक्षेप्रमाणेच विद्यार्थ्याला यामुळे आपल्या गुणांची पडताळणी करणे सोपे होणार आहे. यातून या परीक्षेत अधिक पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
सदर शिष्यवृत्ती परीक्षा मराठी, इंग्रजी, हिंदी, उर्दू आणि गुजराथी या चार भाषांमध्ये होणार आहे. जिल्ह्यात जिल्हाधिकारी, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागाचे तीन भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत. तर तालुकास्तरावर गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथके परीक्षेवर नजर ठेऊन असणार आहेत.
विशेष म्हणजे यंदा विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेवर हाताने आसनक्रमांक लिहावा लागणार नाही तर तरो उत्तरपत्रिकेवर प्रिंटेड असणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्याला उत्तरपत्रिका भरण्यासाठी लागणारा वेळ देखील वाचणार आहे. स्वाक्षरी पट देखील छापील असल्यामुळे यावर विद्यार्थ्यांना केवळ सही करावी लागणार आहे.