टोर्इंगवरील वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याची दादागिरी ; वाहनचालकास मारहाण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2018 11:23 PM2018-06-05T23:23:59+5:302018-06-05T23:23:59+5:30
नाशिक : चारचाकी वाहन टोर्इंग करण्यापुर्वी लाऊनस्पीकरवर वाहन काढून घेण्यासंदर्भात पूर्वसूचना देणे आवश्यक असतानाही त्याचे पालन न करता टोर्इंग करणाऱ्या वाहतूक पोलिसास वाहनचालकाने मंगळवारी (दि़५) चांगला धडा शिकविल्याची घटना महापालिकेच्या राजीव गांधीभवनसमोर घडली़
नाशिक : चारचाकी वाहन टोर्इंग करण्यापुर्वी लाऊनस्पीकरवर वाहन काढून घेण्यासंदर्भात पूर्वसूचना देणे आवश्यक असतानाही त्याचे पालन न करता टोर्इंग करणाऱ्या वाहतूक पोलिसास वाहनचालकाने मंगळवारी (दि़५) चांगला धडा शिकविल्याची घटना महापालिकेच्या राजीव गांधीभवनसमोर घडली़ वाहनचालकाने टोर्इंगवरून पूर्वसूचना देण्यात आली नसल्याचे मोबाईलवर चित्रीकरण करून पोलीस आयुक्तांकडे तक्रार करणार असल्याचे सांगताच या वाहतूक पोलिसांने चारचाकी वाहनचालकास मारहाण केली़ मात्र नागरिकांच्या वाढती गर्दी व प्रश्नांमुळे टोर्इंग केलेले वाहन सोडून पोलीस कर्मचा-याने पलायन करणे पसंत केले़
प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास महापालिकेसमोरील आयसीआयसीआय बॅकेजवळ रस्त्याच्या कडेला चारचाकी उभी होती़ यावेळी टोर्इंगचे वाहन आले व लाऊडस्पीकरवरून कोणतीही पूर्वसूचना न देता वाहनाचे टोर्इंग केले़ चारचाकी वाहनचालकाने सुरुवातीलपासून आपल्या मोबाईलमध्ये या घटनेचे सर्व चित्रिकरण केले, तसेच वाहन टोर्इंग करून नेले जात असतानाच आडवे होत तुम्ही अगोदर वॉनिंग का दिली नाही असा जाब विचारला़ तसेच हा जाब विचारतानाही आपल्या मोबाईलमध्ये चित्रिकरण सुरूच ठेवले व याबाबत पोलीस आयुक्तांकडे पुराव्यासहीत तक्रार करणार असल्याचे सांगितले़
टोर्इंग वाहनावरील वाहतूक पोलीस कर्मचाºयास आपली चूक लक्षात आल्याने तसेच चारचाकी वाहनचालकाकडे व्हिडीओ रेकॉर्डींगचे पुरावे असल्याचे लक्षात आल्याने त्याने दमदाटी करण्यास सुरुवात करून वाहनचालकास मारहाण केली़ यानंतर टोर्इंग कर्मचारीही या वाहनचालकास मारण्यासाठी सरसावले़ टोर्इंगवाल्याची ही दादागिरी पाहून नागरिक जमा झाले व त्यांनी पोलीस तसेच टोर्इंगवरील कर्मचाºयांना जाब विचारण्यास सुरवात केली़ नागरिकांची वाढती गर्दी पाहाता वाहतूक पोलीस व टोर्इंगवरील कर्मचा-यांनी कारवाई थांबवित घटनास्थळावरून पाय काढून घेण्यात धन्यता मानली़
शहरातील बेशिस्त वाहनधारकांना शिस्त लावल्याच्या हेतूने देण्यात आलेल्या टोर्इंगचा ठेका हा शिस्तीऐवजी वसुलीसाठी सुरू केल्याच्या प्रतिक्रीया नागरिकांनी यावेळी व्यक्त केल्या़ टोर्इंगचालकाची नागरिकांवरील दिवसेंदिवस वाढती मुजोरी, या वाहनावरील वाहतूक पोलिसास मिळणारी वरकमाई तसेच पोलीस उपायुक्तांच्याही आदेशास न जुमाननारा ठेकेदार यामुळे टोर्इंग खरेच नाशिककरांच्या शिस्तीसाठी आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे़