पुर्नस्थापनेसाठी निलंबित कर्मचाऱ्यांचे प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 05:58 PM2018-11-15T17:58:15+5:302018-11-15T17:58:59+5:30
नाशिक : कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी निलंबीत करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांनी पुर्सस्थापनेसाठी प्रयत्न सुरू केले असल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश ...
नाशिक : कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी निलंबीत करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांनी पुर्सस्थापनेसाठी प्रयत्न सुरू केले असल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गीते यांनी याप्रकरणी संबंधितांमध्ये सुधारणा आणि प्रशासकीय बाबींची पुर्तता असेल तरच प्रस्तावावर विचार करण्याचा निर्णय घेतल्याने अशा कर्मचाऱ्यांना अजूनही वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे.
ङ्क्त जिल्हा परिषदेच्या निलंबित कर्मचा-यांना पुर्नस्थापना मिळावीसाठी विविध माध्यमातून प्रस्ताव सादर करण्यात येत आहेत. अशाप्रकारचे प्रस्ताव दाखल होत असले तरी काही आक्षेप अजूनही कायम असतांना आणि कामकाजाची पुर्तता केलेली नसल्याने असे प्रस्ताव कोणत्याही कारणास्तव मंजूर करण्यात येणार असल्याची भूमिका प्रशासनाने घेतली आहे. प्रस्ताव सर्व प्रशासकीय बाबींची पुर्तता करुनच सादर करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गिते यांनी दिले आहेत.
सुरगाणा येथील प्रकाश अहिरे या ग्रामसेवकास कर्तव्यात कसूर केल्याने गट विकास अधिका-यांनी त्यांना जिल्हा परिषदे सेवेतून निलंबित केले होते. ग्रामपंचायत विभागाने ग्रामसेवकाच्या पुर्नस्थापनेचा प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिका-यांकडे मान्यतेसाठी सादर केला होता. मात्र सदर ग्रामसेवकाने त्याचेकडील दप्तर तपासणीसाठी उपलबध करून दिले नसल्याचे सुरगाणा येथील गटविकास अधिकारी केशव गडडापोड यांनी निर्दशनास आणून दिल्याने डॉ. गिते यांनी सदरची नस्ती विभागास परत करत सर्व प्रशासकीय बाबींची पुर्तता करूनच प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश ग्रामपंचायत विभागाला दिले आहेत.