त्र्यंबकेश्वर जबरी लुटीतील पाच आरोपींना सक्तमजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 09:38 PM2018-03-26T21:38:11+5:302018-03-26T21:38:11+5:30
नाशिक : श्रावणी सोमवारनिमित्त त्र्यंबकेश्वरला ब्रह्मगिरीच्या फेरीसाठी आलेल्या भाविकाला मारहाण करून लुटणाऱ्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पाच आरोपींना जिल्हा व सत्र न्यायाधीश एस़ टी़ पाण्डेय यांनी सोमवारी (दि़२६) प्रत्येकी दोन वर्षे सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली़

१२ आॅगस्ट २०१३ रोजी प्रकाश विनायक मोरे हे श्रावणी सोमवारनिमित्त ब्रह्मगिरीला पायी फेरी मारण्यासाठी गेले होते़ वाडीव-हे पोलीस ठाणे हद्दीतील खडवाडी शिवारात पहिणे खोडवे रोडवरून मोरे हे पायी जात असताना संशयित विष्णू नानासीराम पेहरे, बाळू मनाजी पेहरे, अंकूश काळू पेहरे, गणपत त्र्यंबक पेहरे व यशवंत चंदर पेहरे (सर्व रा़ खडकवाडी, ता़ त्र्यंबकेश्वर, जि़नाशिक) यांनी रस्त्यात अडवून जबर मारहाण केली़ तसेच मोरे यांच्याकडील २३ हजार रुपये किमतीचा मोबाइलची लूट केली़
या प्रकरणी मोरे यांनी वाडीव-हे पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर आरोपींवर जबरी लूट व दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता़ या खटल्यात सरकारी वकील अॅड़ वाय़ डी़ कापसे यांनी न्यायालयात सादर केलेल्या सबळ पुराव्यान्वये न्यायाधीश पांडे यांनी या पाचही आरोपींना दोन वर्षे सक्तमजुरी, प्रत्येकी दोन हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने साध्या कैदेची शिक्षा सुनावली़ या खटल्यात सरकारी वकील कापसे यांना पैरवी अधिकारी बी़ एऩ सांगळे यांनी मदत केली़