त्र्यंबकेश्वर देवस्थानावर १३ विश्वस्तांच्या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 08:13 PM2018-05-20T20:13:38+5:302018-05-20T20:25:16+5:30
नाशिक : त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्तांची संख्या वाढवून ती नऊ ऐवजी १३ करावी या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याची माहिती विश्वस्त ललिता शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली़
नाशिक : त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्तांची संख्या वाढवून ती नऊ ऐवजी १३ करावी या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याची माहिती विश्वस्त ललिता शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली़ बारा ज्योर्तिलिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर देवस्थानावर सद्य:स्थितीत नऊ सदस्य असून, त्यापैकी पाच सदस्य हे परंपरेने कायम असतात़ परंपरेने असलेल्या सदस्यांच्या हितसंबधांमुळे उर्वरित चार विश्वस्तांकडून सादर झालेले भाविकांच्या हिताचे प्रस्ताव बहुमताअभावी मंजूर होत नाहीत़ त्यामुळे देवस्थानावरील विश्वस्तांची संख्या वाढविण्याबरोबरच सर्व विश्वस्तांना ठराविक कालावधीसाठी अध्यक्षपदाची संधी मिळावी, असेही या याचिकेत नमूद करण्यात आले आहे़
शिंदे यांनी सांगितले की, त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टची एक हजार हेक्टर जमीन असून, यामधील विविध घोटाळे बाहेर येत आहेत़ त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असली तरी ट्रस्टचा अपेक्षेप्रमाणे विकास झालेला नाही़ याचे प्रमुख कारण म्हणजे विश्वस्त मंडळाची मर्यादित संख्या असल्याचे लक्षात आल्यानंतर याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली़ या याचिकेची पुढील सुनावणी २ जुलै रोजी होणार आहे़ या विश्वस्त मंडळात महिलांसाठी आरक्षण असावे, अशी मागणीही याचिकेत करण्यात आली आहे़ त्र्यंबकेश्वर देवस्थान ही पब्लिक ट्रस्ट असल्याने देवस्थानचे अध्यक्षपद जनतेतून येणाºया प्रतिनिधींना मिळावे, सद्य:स्थितीत हे अध्यक्षपद कायमस्वरूपी असल्याने या ठिकाणी एकाधिकारशाही होत आहे़ यामुळे इतर विश्वस्तांच्या मताला कोणतीही किंमत राहत नसल्याचे शिंदे यांचे म्हणणे आहे़
युनोस्कोच्या माध्यमातून जगाच्या नकाशावर पोहोचलेल्या त्र्यंबकेश्वरच्या विश्वस्तांची जबाबदारी वाढली आहे़ गत पाच वर्षांच्या अनुभवावरून भाविकांच्या हिताचे विविध विषय समोर आले, त्यानुसार निर्णय घेऊन काम करण्याचा प्रयत्न केला असता तो बहुमताने हाणून पाडला जातो़ त्यामुळे धर्मादाय आयुक्तांकडून निवडलेले चार सदस्य हे नेहेमीच अल्पमतात असता़ भाविकांचा मूलभूत सोयी, सुविधा कशा उभारता येतील यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे़ देशातील विविध देवस्थानांमध्ये मिळणाºया सुविधांचा विचार करता त्र्यंबकेश्वरला येणा-या भाविकांनाही उच्च प्रतिच्या सुविधा का मिळू नये? असा प्रश्न ललिता शिंदे यांनी उपस्थित केला़