लघुपाटबंधारे, बांधकाम विभागाचे अभियंता अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2019 05:46 PM2019-01-09T17:46:06+5:302019-01-09T17:46:48+5:30
नाशिक : जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता आणि कार्यालयीन कर्मचाऱ्यांच्या बेफीकीरीचा विषय जिल्हा नियोजन आराखडा बैठकीप्रसंगी चर्चिला गेल्याने जिल्हा परिषदेचे ...
नाशिक: जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता आणि कार्यालयीन कर्मचाऱ्यांच्या बेफीकीरीचा विषय जिल्हा नियोजन आराखडा बैठकीप्रसंगी चर्चिला गेल्याने जिल्हा परिषदेचे चांगलेच वाभाडे निघाले. मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी कार्यालयीन शिस्त आणि कामकाजाला गती येण्यासाठी अनेकविध कारवाया केल्या असल्या तरी पदाधिकाºयांनी थेट पालकमंत्र्यांकडे तक्रारी केल्याने याचे पडसाद नियोजन समिती बैठकीत उमटले. पालकमंत्र्यांनी पदाधिकाºयांच्या तक्रारींची गांभिर्याने दखल घेत कारवाईचे आदेशही दिले.
जिल्हा परिषदेमध्ये पदाधिकाºयांनी अधिकाºयांच्या कामकाजावर अनेकदा आक्षेप नोंदविले असून सभेमध्ये अधिकाºयांची कामचुकारपणाचे पुरावे देखील सादर केले आहेत. अशा तक्रारींनतर वारंवार सुधारण्याची अपेक्षा करून पदाधिकाºयांनी देखील अधिकाºयांना तशी संधी दिली. मात्र अधिकारी, कर्मचाºयांची मनमानी कायम असल्याचे पुन्हा अधोरेखीत झाले.
विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत पंतप्रधान आवास योजना व पाणी पुरवठा योजनेच्या कामाबाबत पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आढावा घेतला. जिल्ह्यात या दोन्ही कामांमध्ये विक्रमी कामकाज झाल्याने त्यांनी जिल्हा परिषदेचे कौतूक केले. मात्र जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभाग व बांधकाम विभाग तीन विभागाच्या टेंडर प्रक्रियेच्या कामाबाबत पदाधिका-यांनी तक्रारी केल्याने दोन्ही विभागांच्या कार्यकारी अभियंत्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचेही पालकमंत्री जाहिर केले. मुख्य कार्यकारी अधिकाºयांना देखील तसे आदेश दिले. पुरवठा योजनेच्या कामाबाबतही पालकमंत्री महाजन यांनी जिल्हा परिषदेचे कौतूक केले. ई- निविदेच्या कामात विलंब करणा-या तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांनीही नोटीसा दिलेल्या लघुपाटबंधारे व बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांबाबत पदाधिकाºयांनी तक्र ारी केल्याने अखेर महाजन यांनी संबंधितांवर कारवाई करण्याचा इशारा दिला.