तेवीस हजार बालकांनी केले तालासुरात पसायदानाचे पठण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2019 05:51 PM2019-11-24T17:51:50+5:302019-11-24T17:52:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या विविध मराठी आणि इंग्रजी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या विविध मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या तब्बल 23 हजार विद्याथ्र्यानी आपापल्या विद्यालयाच्या प्रांगणामध्ये तालासुरात पसायदान गायले.
संत ज्ञानेश्वरांच्या 726व्या संजीवनी समाधी वर्षाच्या निमित्ताने संस्थेचे अध्यक्ष प्रा. सूर्यकांत रहाळकर यांच्या नेतृत्वाखाली शालेय पदाधिकारी, शाळा समितीप्रमुख आणि अन्य शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्याथ्र्यानी शनिवारी पसायदानाचे पठण केले. सीईओ मेरी हायस्कूलचे प्रांगण, रंगूबाई जुन्नरे इंग्लिश मीडियम स्कूल तसेच अन्य शाळांच्या प्रांगणात विद्याथ्र्यानी पसायदान म्हणत संत ज्ञानेश्वरांना अभिवादन केले. सर्व शाळांमध्ये संत ज्ञानेश्वरांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या कार्याची महती विद्याथ्र्याना सांगण्यात आली. संत ज्ञानेश्वरांना सहन कराव्या लागलेल्या अनंत यातनेनंतरदेखील त्यांच्या ज्ञानेश्वरीत विश्वबंधुत्वाची भावना प्रकट केली आहे. ज्ञानेश्वरीच्या सांगतेमध्ये पसायदान मागतानादेखील केवळ आपल्यापुरते किंवा आपल्या समाजापुरते, देशापुरते न मागता संपूर्ण विश्वासाठी देवाकडे मागणो मागितल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले. संत ज्ञानेश्वरांनी या ग्रंथातून अनेक वैज्ञानिक सत्यदेखील उलगडून दाखवली असून, त्याचा प्रत्यय या ग्रंथाच्या पानोपानी मिळतो. त्यामुळे विद्याथ्र्यानी ज्ञानेश्वरीतील ओव्या